Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप

कोपरगाव तालुका ः कोकमठाण येथील अल्पावधीतच नावारूपाला आलेले राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी महाविद्यालय, या महाविद्यालयाच्या बी. फार्मसीच्या अंत

’आपली खरेदी आपल्या गावात’ उपक्रमातून आर्थिक उलाढाल वाढणार ः पुष्पाताई काळे
पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे शनिदर्शन
वापरात नसलेल्या खात्यातून परस्पर काढले पैसे

कोपरगाव तालुका ः कोकमठाण येथील अल्पावधीतच नावारूपाला आलेले राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी महाविद्यालय, या महाविद्यालयाच्या बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. या समारंभास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फौन्डेशनचे अध्यक्ष  चांगदेवराव कातकडे, सचिव प्रसाद कातकडे, विश्‍वस्त दिपक कोटमे, विश्‍वस्त व उद्योजक विजय कडू, विश्‍वस्त  प्रणित कातकडे  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जैन, उपप्राचार्या उषा जैन, प्रा. डॉ. विजय जाधव, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आदी उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष चांगदेवराव कातकडे म्हणाले की, मनुष्याने स्वतःच्या आत सतत ज्ञान रुजवत राहिले पाहिजे.आयुष्य जगताना प्रत्येक कृतीतून सतत शिकत राहिले पाहिजे. पदवी मिळाली म्हणून थांबू नका ज्ञानाची भूक ही प्रत्येकाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असली पाहिजे.., अशी व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही व अश्या ज्ञानी व्यक्तीला कुणीही हरवू शकत नाही. आज तुम्हाला जड अन्तःकरणाने निरोप देताना मन जरी दुखी होत असले तरी एक आनंद हाही आहे की, उद्याचे तुम्ही पदवीधर युवक म्हणून उज्वल भारताचे वर्तमान व भविष्य असणार आहे. तुम्ही मिळवलेले ज्ञान हेच तुमचे उद्याचे भांडवल असणार आहे असे प्रतिपादन केले. संस्थेचे प्राचार्य डॉ. नितीन जैन यांनी या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी फार्मसी मधील नवनवीन संधी, संस्थेत लवकरच सुरु होत असलेले एम. फार्मसी चे नवीन अभ्यासक्रम, औषधनिर्निती कंपनी व त्यातील संधी, विविध शासकीय सेवेतील फार्मसी करिअर, अश्या अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी अंतिम वर्षातील कु. स्नेहल चव्हाण, कु. श्‍वेता काळे, कु. अनुष्का पोलानी, कु. ऋतुजा वर्पे, चि. संदेश डिके या विद्यार्थ्यांनी भावनिक होऊन त्यांच्या चार वर्षांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त करत संस्थेबद्दल, महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ उषा जैन यांनीही विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत  मला माझ्या विद्यार्थ्यांच्या  क्षमतेवर पूर्ण विश्‍वास आहे. जीवनात योग्य निर्णय घ्या, कठोर परिश्रम करा, जीवनात आशावादी रहा आणि तुमच्या स्वप्नांचे अनुसरण करा असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख कावेरी चौधरी व उत्कर्षा लासुरे यांनी केले.

COMMENTS