मोठ्या गगनचुंबी इमारतींवरुन स्टंट करणाऱ्या प्रसिद्ध फ्रेंच डेअरडेव्हिल रेमी लुसीडी बाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका इमारतीवर स्
मोठ्या गगनचुंबी इमारतींवरुन स्टंट करणाऱ्या प्रसिद्ध फ्रेंच डेअरडेव्हिल रेमी लुसीडी बाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका इमारतीवर स्टंटसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करताना पाय घसरून तो ६८ व्या मजल्यावरुन खाली पडला. खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ३० वर्षीय हा तरुण पेंटहाऊस बाहेर स्टंट करत होता. स्टंट करत असताना आपला पाय घसरत आहे असं त्याला जाणवलं. त्याने स्वतःला सावरण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र त्याला स्वतःला सावरता आलं नाही आणि तो धाडकन खाली आदळला.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत एका महिलेने हा अपघात होताना पाहिल्याचं म्हटलं आहे. इमारतीत स्टंट करताना घसरल्यावर या तरुणाने स्वताला वाचवत असताना एका खिडकीला पकडण्याचा प्रयत्न केला. तेथे आतमध्ये एक महिला देखील होती. तरुणाला पाहून महिला प्रचंड घाबरली.प्रसिद्ध स्टंट मॅनच्या निधनाने चाहत्यांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. इंस्टा अकाउंटवर रेमीने त्याच्या स्टंटचे अनेक व्हिडिओ पोस्ट केलेत. साल २०१२ पासून तो अशा पद्धतीचे स्टंट करत होता. फोटोग्राफी हा देखील त्याचा छंद होता. अंगाचा थरकाप उडवणारे त्याचे सर्वच स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
COMMENTS