Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चुलीवर भाजली भाकरी

'माझी तुझी रेशीगाठ' या काहीच महिन्यांपूर्वी संपलेल्या झी मराठीवरील मालिकेतील सिम्मी काकू आठवतेय का? सिम्मी काकू आता चुलीवर भाकरी भाजण्याचा आनंद घ

तरुणांनी गांधीजींच्या विचाराने भारताच्या समृध्द प्रगतीसाठी योगदान द्यावे – श्री.थानेदार  
सयाजीराव गायकवाड हे युगद्रष्टे महाराजा – बाबा भांड
जीडीपीचे दर आठवडयाला दहा हजार कोटींचे नुकसान


‘माझी तुझी रेशीगाठ’ या काहीच महिन्यांपूर्वी संपलेल्या झी मराठीवरील मालिकेतील सिम्मी काकू आठवतेय का? सिम्मी काकू आता चुलीवर भाकरी भाजण्याचा आनंद घेतेय, असं सांगितलं तर कोणाला तरी खरं वाटेल का? सिम्मी नव्हे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री शीतल क्षीरसागर हा अनुभव एन्जॉय करते आहे.  शीतल ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘रमा राघव’ मालिकेत काम करत असून ती सोशल मीडियावरही विशेष सक्रिय आहे. अभिनेत्रीने अलीकडेच एक भारी व्हिडिओ शेअर केला. शीतलने अलीकडेच तिने कोकणातील गावी घेतलेला चुलीवरची भाकरी भाजण्याचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये ती भाकऱ्या थापताना दिसते आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती ती चुलीवर ठेवलेल्या तव्यावर भाकरी शेकवताना दिसली. भाकरी भाजून झाल्यानंतर शीतलने कौतुकाने व्हिडिओमध्ये तिने भाजलेली भाकरी दाखवली. शीतलच्या चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेत्रीने हे व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिलं की, ‘चुलीवरची तांदळाची भाकरी… फायनली… तुम्ही जाणकारांच्या सानिध्यात आणि त्यांच्या कमेंट ऐकत असाल तर सगळं काही शक्य आहे. पहिल्यांदाच प्रयत्न केला, पण मी करून दाखवलं.’ अभिनेत्रीने या पोस्टमध्ये काही हॅशटॅग वापरले आहेत, त्यामध्ये एक #Konkan असाही हॅशटॅग आहे. त्यावरुन तिने शीतलने कोकणातून हा अनुभव शेअर केला आहे.

COMMENTS