Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने दाखवली सिंघम 3 ची झलक

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या आगामी चित्रपटाची  चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.काही दिवसां

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील जेठालाल घेणार मोठा ब्रेक
रणवीर सिंगसोबत ‘डॉन ३’मध्ये दिसणार प्रियांका चोप्रा
मिशन रानीगंज – द ग्रेट भारत रेस्क्यू’ चा थरारक ट्रेलर रिलीज

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या आगामी चित्रपटाची  चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील दीपिका पदुकोणच्या लूकचा फोटो रोहितनं सोशल मीडियावर शेअर केला होता. दीपिका ही या चित्रपटात शक्ती शेट्टी ही भूमिका साकारत आहे. तर अभिनेता टायगर श्रॉफ हा या चित्रपटात एसीपी सत्या ही भूमिका साकारत आहे. आता नुकतेच रोहितनं  सिंघम अगेन या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

रोहित शेअर केलेल्या फोटोमध्ये काही गाड्या दिसत आहेत. या गाड्यांना आग लागलेली दिसत आहे. रोहित शेट्टीच्या प्रत्येक चित्रपटामध्ये गाड्यांना विशेष महत्व असते. आता सिंघम अगेन या चित्रपटात देखील विविध गाड्या दिसणार आहेत. रोहितनं सिंघम अगेन या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “WORK IN PROGRESS ‘सिंघम अगेन ” नेटकऱ्यांनी रोहितनं शेअर केलेल्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

COMMENTS