Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध कॉमेडी शो फ्रेंड्सचे अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन

लॉस एंजेलिस प्रतिनिधी - प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, बाथ टबमध्ये आढळला मृतदेह प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मॅथ्यू पेरीचं वयाच्य

एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण
पैगंबरांच्या अपमानचा बदला घेण्यासाठीच उमेश कोल्हेंची हत्या
सांदिपनी अकॅडमीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या अंगणात लावला आनंदाचा दिवा

लॉस एंजेलिस प्रतिनिधी – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, बाथ टबमध्ये आढळला मृतदेह प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मॅथ्यू पेरीचं वयाच्या 54 व्या वर्षी निध झालं आहे. ‘फ्रेंड्स’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये चँडलर बिंगच्या भूमिकेमुळे मॅथ्यू जगभरात प्रसिद्ध झाला होता. मॅथ्यू पेरीच्या निधनाने चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.मिळालेल्या माहितीनुसार , मॅथ्यू पेरी शनिवारी त्याच्या लॉस एंजेलिस येथील घरात बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळला. सूत्रांच्या हवाल्याने मॅथ्यू पेरीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. बाथ टबमध्ये बुडून मॅथ्यू पेरीचं निधन झाल्याचा अंदाज आहे.मॅथ्यू पेरीने 1990 च्या दशकात प्रसिद्ध अमेरिकन टेलिव्हिजन कॉमेडी सीरिज ‘फ्रेंड्स’मध्ये मुख्य भूमिका साकारली. ही कॉमेडी मालिका 1994 ते 2004 अशी 10 वर्ष सुरु होती. फ्रेंड्सव्यतिरिक्त मॅथ्यू पेरीने रोम-कॉम, फूल्स रश इन, द होल नाइन यार्ड्ससह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्राइम कॉमेडी द होल नाईन यार्ड्समध्ये त्याने ब्रूस विलिसच्या सोबत स्क्रीन शेअर केली

COMMENTS