मुंबई प्रतिनिधी - भारतीय मनोरंजनसृष्टी या नात्या कारणामुळे चर्चेत आहे. अशातच आता बॉलिवूडमधून मोठी येत आहे. काल रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे

मुंबई प्रतिनिधी – भारतीय मनोरंजनसृष्टी या नात्या कारणामुळे चर्चेत आहे. अशातच आता बॉलिवूडमधून मोठी येत आहे. काल रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने चित्रपटसृष्टीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हे रॅकेट प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल चालवत असल्याचा दावा मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. यानंतर आरतीला अटक करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या समोर आलेल्या प्रकरणामुळे इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने गोरेगाव येथील घटनास्थळावरून दोन मॉडेल्सची सुटका करून त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले आहे. आरतीने त्यांना प्रत्येकी 15,000 रुपये देण्याचे वचन दिल्याचे दोन्ही मॉडेल्सनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हॉटेलमध्ये डमी ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आणि आरतीला अटक केली
COMMENTS