Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तोतया पोलिसांच्या कारनाम्याचा पर्दाफाश; दुचाकीसह दोघे अटकेत

वडूज / प्रतिनिधी : पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून खटाव तालुक्यातील वडूज शहर परिसरातील वृध्दांना लुटणार्‍या दोन तोतया पोलीसांना आज व

विशाळगडावरील घटना दुर्दैवी : आ. जयंत पाटील
तोतया एसीबीच्या टीमचा छापा; निवृत्त अधिकार्‍याच्या घरी सिनेस्टाईलने लाखो लुटले
विधानसभा निवडणूकीसाठी यंत्रणानी सज्ज रहावे : जितेंद्र डुडी

वडूज / प्रतिनिधी : पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून खटाव तालुक्यातील वडूज शहर परिसरातील वृध्दांना लुटणार्‍या दोन तोतया पोलीसांना आज वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेले दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पूणे येथील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे. सिराज जाफर इराणी, मुस्लिम नासिर इराणी (दोघेही रा. लोणी काळभोर, जि. पुणे) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात गेल्या वर्षभरापासून आपण पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तसेच दुकानांत खरेदी करण्याच्या बहाण्याने वृध्दांना लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. बँका, व्यवसायिक दुकाने येथे टेहाळणी करून हे चोरटे त्याठिकाणी असलेल्या वृध्दांना हातोहात फसवून लुटत होते. डोक्याला हेल्मेट, तोंडाला रूमाल बांधून आल्याने ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये ओळखता येत नसल्याने तोतया पोलिसांना पकडण्याचे पोलीसांसमोर आव्हान होते. आज सोमवार, दि. 21 रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान वाहतूक पोलीस अजय भोसले, गजानन वाघमारे शहरात बंदोबस्तावर असताना त्यांना युनिकॉर्न एमएच 12 एसजी 5163 या क्रमांकाच्या दुचाकीवरून अज्ञात दोघेजण शहरात संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. शहरातील स्टेट बँकेच्या वडूज शाखेसमोर ते दोनजण काही वेळ थांबले. त्यानंतर ते पुसेगाव रोडवरील बँक ऑफ इंडियाकडे गेले. तेथून पुढे जावून त्यांनी दिवाणी न्यायालयापासून त्यांची दुचाकी परत आणली व बँक ऑफ इंडियासमोर उभी केली. त्यावेळी वाहतूक पोलीस भोसले व वाघमारे यांनी त्यांना हटकून दोघांना पकडले. त्यावेळी पोलीस व त्यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी त्यांना पकडून ठेवले होते. तसेच घटनास्थळी नागरिकांचीही गर्दी झाल्याने त्यांना तेथून पलायन करता आले नाही. यावेळी नासिर इराणी याने स्वत:कडील लॅमिनेशन केलेले ओळखपत्र तोंडात टाकून खाऊ लागला. तेंव्हा वाहतूक पोलिसांनी त्याच्या तोंडातील ते ओळखपत्र काढले. यावेळी त्याने त्यांच्या बोटांना चावाही घेतला.
घटनास्थळी वडूजचे सपोनि अमोल माने, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार शिवाजीराव खाडे, मकसूद शिकलगार, सागर बदडे, कुंडलीक कठरे दाखल झाले. पोलिसांनी संबंधितांना पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या विरोधात पुण्यातील वानवडी, सहकारनगर, हवेली, डेक्कन, चर्तु:श्रृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, मार्केट यार्ड, चिंचवड, हडपसर, विमानतळ या पोलीस स्टेशनमध्ये एकूण विविध 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. अधिक तपासासाठी जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी येथे दाखल झाले होते.

COMMENTS