ठाणे ः अंबरनाथमध्ये तोतया महिला आमदाराला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिलेने लोकांना फसवण्यासाठी आपल्या गाडीवर विधीमंडळ सदस्याचे स्टिकर लावले

ठाणे ः अंबरनाथमध्ये तोतया महिला आमदाराला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिलेने लोकांना फसवण्यासाठी आपल्या गाडीवर विधीमंडळ सदस्याचे स्टिकर लावले होते. हे स्टिकर दाखवून महिला आपण आमदार असल्याचे भासवत होती. एका व्यक्तीची 5 लाखांची फसवणूक केल्यानंतर या महिलेचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या महिलेसह दोघांना अटक केली आहे. वंदना संजय मिश्रा असे तोतया आमदाराचे नाव आहे. अनमोल कुमार सिंह यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
COMMENTS