Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बनावट ‘आधार कार्ड’ वर बसणार चाप, सरकारनं घेतला मोठा निर्णय

आधार कार्ड संदर्भात UIDAI ने नियमावली जारी केली याबाबत राज्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन केले

बनावट आधार कार्डवर चाप घालण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार कार्

शनिशिंगणापुरात शनि लीलामृत पाच दिवसीय ग्रंथ पारायण
केंद्रीय मंत्री, न्यायाधीश अणि पत्रकारांचे फोन टॅप : सुब्रमण्यम स्वामी
आरक्षण कोर्टाची की सरकारची जवाबदारी : बाळासाहेब दोडतले

बनावट आधार कार्डवर चाप घालण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी व्हेरिफिकेशन (पडताळणी) करणे गरजेचं आहे, असे आयटी मंत्रालयानं सांगितलं. आधार कार्ड संदर्भात  UIDAI ने नियमावली जारी केली आहे. यामध्ये आधार कार्ड स्वीकारण्यापूर्वी संस्थांनी पडताळणी करणं गरजेचं असल्याचं म्हटलेय.

आधार कार्डची पडताळणी कशी होईल?
UIDAIने जारी केलेल्या नियमावलीत म्हटले की, आधार कार्ड जमा केल्यानंतर त्या व्यक्तीच्या संमतीनंतर आधार क्रमांकाची पडताळणी करावी.  एखाद्या व्यक्तीने सादर केलेल्या कोणत्याही प्रकारच्या आधारचा (आधार कार्ड, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड, आणि एम-आधार) खरेपणा तपासण्यासाठी योग्य पाऊल आहे. त्यासाठी mAadhaar App, किंवा Aadhaar QR कोड स्कॅनर वापरून सर्व प्रकारच्या आधारची पडताळणी केली जाऊ शकते.  QR कोड स्कॅनर Android आणि iOS आधारित मोबाइल फोनवरील अॅप्लिकेशनसाठी विनामूल्य आहे.युआयडीएआयने वापरापूर्वी आधार पडताळणीच्या आवश्यकतेवर  भर देण्याची  राज्य सरकारांना विनंती केली आहे. याबाबत राज्यांना आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS