Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदेंच्या जाहिरातींना फडणवीस समर्थकांचे नांदेडमध्ये प्रत्युत्तर

नांदेड प्रतिनिधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असून ते पुन्हा मुख्यमंत्रिपदी यावेत, यासा

शाहू महाराजांमुळे संभाजीराजे छत्रपती यांची माघार
नंदुरबार राज्यातील पहिला अमली पदार्थ मुक्त जिल्हा
अल्लाह, आमच्या चुका पदरात घे; चांगुलपणाची आणखी एक संधी दे !

नांदेड प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असून ते पुन्हा मुख्यमंत्रिपदी यावेत, यासाठी जनतेचा पाठिंबा असल्याच्या शिंदे गटाच्या माध्यमातील जाहिरातींना नांदेडमध्येही फडणवीस समर्थकांनी बॅनरबाजी करून चोख प्रत्युत्तर दिले आहे.
यात ’50 खोके आणि 105 डोके’, देशात नरेंद्र….राज्यात देवेंद्रच!, असे फलकबाजीतून अधोरेखित करण्यात आले आहे. हे बॅनर शिंदेगटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघात आयटीआय कॉर्नर येथे लावण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे 26.1 टक्के जनतेला वाटते, तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असे 23.2 टक्के जनतेला वाटते, अशी जाहिरात शिंदे गटाने एका सर्वेक्षणाचा दाखला देऊन दोन दिवसांपूर्वी प्रसिध्द केली होती. या जाहिरातीवरून राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. दरम्यान, मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीबाजी करून प्रत्युत्तर दिले. दरम्यान, याचे लोन नांदेडमध्ये पसरले असून फडणवीस समर्थकांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आमदार कल्याणकर यांच्या मतदारसंघात फलक लावले आहेत. या बॅनरवर खोक्यांचे चित्र असून ’50 खोके आणि 105 डोके’, असा मजकूर लिहून त्याखाली आर्य चानक्यासह जनतेचे चित्र आहे. एका बाजूस देशात नरेंद्र….राज्यात देवेंद्रच!, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस समर्थकांनी दिले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले. बॅनरवर फडणवीस समर्थक असा उल्लेख असला तरी, ते कोणी लावले हे समजू शकले नाही. तसेच याची परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, यासंबंधी भाजप व शिंदेगटाकडून यावर सायंकाळपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

COMMENTS