Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदोली राष्ट्रीय उद्यानात झाडांची राजरोसपणे कत्तल

वन्यजीव प्रशासनातील अधिकार्‍यांच्या आशीर्वादाची शक्यता; वन्यजीवच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज; पत्रकार थेट पोहचले अभयारण्यात शिरा

राज्यात आगामी चार दिवस थंडीचे
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल
बोगस बियाणांचा सुळसुळाट

वन्यजीव प्रशासनातील अधिकार्‍यांच्या आशीर्वादाची शक्यता; वन्यजीवच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज; पत्रकार थेट पोहचले अभयारण्यात

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यान वाढत्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नेहमी चर्चेत आहे. त्यातच आता अभयारण्यात राजरोसपणे झाडांच्या कत्तली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक लाभापोटी मोठ्या प्रमाणात झाडांची तस्करी सुरु असल्याचे दिसून येत आहे. तरीही वनजीव विभाग दुर्लक्ष करीत आहे.
चांदोली राष्ट्रीय उदयान सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर 314 चौरस किलोमीटर अंतरावर विस्तारीत आहे. या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, सरपटणारे जीव, विविध प्रकारची झाडे, झुडपे वनसंपदा असल्यामुळे या अभयारण्याला जागतीक दर्जा मिळाला आहे. यामुळे या परिसराची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक व पर्यटक येत असतात. असे असले तरी दुसरीकडे चांदोली राष्ट्रीय उध्यान अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे नेहमी चर्चेत आले आहे. अभयारण्यातील बिबटे, गवे आसपासच्या गावातील पाळीव प्राणी शेती यांचे नुकसान करत आहेत. आता तर अभयारण्यातच वृक्ष तोड सुरू असल्याचे समोर आले आहे.
याबाबत लोकमथंनचे शिराळा प्रतिनिधी आनंदा सुतार व स्थानिक पत्रकार नारायण घोडे यांनी अभयारण्यात जाऊन पाहणी केली असता. त्यांना झाडे तोडल्याचे निदर्शनात आले. चोरट्यांनी पुरावा म्हणून काहीही शिल्लक ठेवलेले नाही. यावेळी तोडलेल्या झाडांचे बुंदे दिसून आले. झाडे तोडण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला झाडावरती खुणा दिसत आहेत. म्हणजेच चोरटे दिवसा खुणा करून रात्रीच्या अंधारात झाडे तोडून नेत आहेत. अभयारण्यात वाळक्या पाल्याला व लाकडाला हात लावायची परवानगी नसतानाही झाडे तोडून नेली कशी जातात. याचे कोडे सर्वसामान्यांना पडले आहे. खाजगी मालकीची झाडे तोडताना मालकांना अनेक अडचणी येत आहेत. असे असताना अभयारण्यातील झाडे तोडलीच कशी जातात. तसेच हे करताना कोणत्या अधिकार्‍यांचा यामागे हात आहे. हे पाहणे गरजेचे आहे.

COMMENTS