Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंडिया आघाडीची 4 जूनला ‘एक्सपायरी डेट’

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

अहमदनगर ः इंडिया आघाडी ही संधीसाधूंची टोळी असून, काँगे्रसने 50 वर्षे गरिबी हटवण्याचे खोटे आश्‍वासन दिले. 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट अस

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी
पंतप्रधान मोदींचा मेट्रोला हिरवा झेंडा
पंतप्रधान मोदींनी केली 41 हजार कोटींच्या प्रकल्पाची घोषणा

अहमदनगर ः इंडिया आघाडी ही संधीसाधूंची टोळी असून, काँगे्रसने 50 वर्षे गरिबी हटवण्याचे खोटे आश्‍वासन दिले. 4 जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असून त्यानंतर या आघाडीचे झेंडे उचलायलाही कोणी मिळणार नाही, अशी खरमरीत टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच मुंबईमध्ये 26/11 रोजी झालेला दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना काँगे्रसकडून सध्या निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे. हा मुंबई हल्ल्यातील सर्व निर्दोष नागरिकांचा अपमान आहे. हा मुंबई हल्ल्यात सर्व दहशतवाद्यांना मारणार्‍या सुरक्षा दलाचा हा अपमान आहे. शहीद तुकाराम वांजळे सारख्या सर्व शहीदांचा हा अपमान असल्याचा जोरदार हल्लाबोल मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
अहमदनगर शहरातील संत निरकांरी मैदानावर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील तसेच शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींचे स्वागत वारकरी पगडी आणि वीणा देऊन करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. भागवत कराड, दादा भुसे, डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे यांच्यासह भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. श्रद्धा आणि सबुरीच्या मंत्र ज्यांनी दिला त्या साईबाबांच्या चरणी मी नतमस्तक होतो, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करतो, विशाल गणपती, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, जोतिबा फुले यांना श्रद्धापूर्वक अभिवादन करतो. मी अहिल्यानगरच्या या पुण्यभूमीला अभिवादन करतो, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला सुरूवात केली.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांचे सहकारी खतरनाक खेळ खेळत असल्याचे मी अनेक दिवसापासून सांगत होतो. आता इंडिया आघाडीच्या एका मोठ्या नेत्याने या खतरनाक खेळावरुन पडदा काढला आहे. जो नेता आताच तुरुंगातून बाहेर आला आहे. तो नेता म्हणजे लालूप्रसाद यादव असून त्यांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार आले मुस्लिमांना आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले असल्याचे मोदींनी म्हटले आहे. इतकेच नाही तर ते मुस्लिमांना पूर्ण आरक्षण देणार असल्याचा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला असल्याचे मोदी म्हणाले.

काँगे्रसचा जाहीरनामा मुस्लिम लीगचा जाहीरनामा – काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा असल्याचा गंभीर दावा पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. भाजप आणि एनडीएतील घटक पक्षातील जाहीरनाम्यात कोणते मुद्दे देण्यात आले आहेत, हे पहा. विकास, गरीब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, देशाचा सन्मान हे सर्व एनडीएच्या जाहीरनाम्यातील मुद्दे असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. यातील एकाही मुद्द्यावर काँग्रेस बोलत नसल्याचा आरोप नरेंद्र मोदी केला आहे.

एससी, एसटीचे आरक्षण काढून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँगे्रसचा डाव – यावेळी काँगे्रसवर जोरदार टीका करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात एससी, एनटी, ओबीसी या समाजाकडे पूर्ण आरक्षण आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडी हे पूर्ण आरक्षण काढून मुसलमान समाजाला देणार असल्याचा गंभीर आरोप मोदी यांनी केला. या माध्यमाूंन केवळ स्वत:च्या मतदारांना खुश करण्याचे काम इंडिया आघाडी करत असल्याचा आरोप मोदी यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास मनाई केली होती. संविधान सभेने देखील प्रचंड विरोध केला होता, मात्र काँगे्रसला संविधान बदलायचे असल्यामुळेच आता धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा अजेंडा काँगे्रसने चालवला असल्याचा आरोप मोदी यांनी केला.

शिर्डी आणि नगरचा चेहरा बदलतोय ः फडणवीस – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संतर निरकांरी मैदानावर तिसरी सभा असून, ही तिसरी सभा दोन्ही सभांपेक्षा रेकॉर्डबे्रक सभा होत आहे. या जिल्ह्यातील दुष्काळी भाग सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही दिली असून, येथील तरूणांना रोजगार मिळवण्यासाठी चार एमआयडीसी मिळवण्यात यश आल्याचा दावा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

COMMENTS