Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्या कॅनव्हास पेंटिंग स्पर्धेसह प्रदर्शन!

अजिंक्य चांदणे : साहित्य सम्राट गौरव महोत्सवाचा उपक्रम

बीड प्रतिनिधी - बीडमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मोत्सवानिमित अभूतपूर्व कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्या अनुषंगाणे यंदाचा साहित्य

सावित्रीमाई स्मृतिदिनी आयटक, एआयएसएफ तर्फे अभिवादन
भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी देशमुख तर काळे शहराध्यक्ष
राज्यसभेचे 19 खासदार निलंबित

बीड प्रतिनिधी – बीडमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मोत्सवानिमित अभूतपूर्व कार्यक्रम संपन्न होत आहेत. त्या अनुषंगाणे यंदाचा साहित्य सम्राट गौरव महोत्सव एकूण चार दिवस होतो आहे. या गौरव महोत्सवातील कार्यक्रमांची सुरुवात  1 ऑगस्टपासून झाली आहे. आज शनिवार (दि.5) ऑगस्ट रोजी शहरातील हॉटेल निलकमल येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत  कॅनव्हास पेंटिंग स्पर्धा व प्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. असा हा साहित्य सम्राट गौरव महोत्सव पहिल्यांदाच साजरा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी महोत्सवातील कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य सम्राट गौरव महोत्सवाचे निमंत्रक अजिंक्य चांदणे, अध्यक्ष अमृत सारडा, सचिव सुभाष लोणके यांनी केले आहे.
   साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड यांच्याकडून बीड शहरात साहित्य सम्राट गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी विविध ऐतिहासिक कार्यक्रम राबवून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होते. त्या अनुषंगाने यंदाचा साहित्य सम्राट गौरव महोत्सव अभूतपूर्व ठरणार आहे. बीड सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून साजरा होत असलेला साहित्य सम्राट गौरव महोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना नागरिकांना उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य सम्राट गौरव महोत्सवाचे निमंत्रक अजिंक्य चांदणे, अध्यक्ष अमृत सारडा, सचिव सुभाष लोणके यांनी केले आहे.

COMMENTS