बीड प्रतिनिधी - पत्रकारांचे सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेऊन आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी त्यां
बीड प्रतिनिधी – पत्रकारांचे सामाजिक कार्यातील योगदान लक्षात घेऊन आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी त्यांच्या खासगी दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या पत्रकारांना व त्यांच्या रक्तातील नातेवाईकांना तपासणी फीसमध्ये 100 टक्के सूट जाहीर केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे आणि व्हॉईस ऑफ मीडियाचे बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे यांच्या सहीचे पत्रकारांना आरोग्य सद्भावना कार्ड देण्यात आले आहे. हे कार्ड दाखवून पत्रकारांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनसमोर हा प्रस्ताव मांडला होता. डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत ही योजना प्रत्यक्षात कृतीत उतरवली आहे. या योजनेनुसार बीड जिल्ह्यातील खासगी दवाखान्यातील तपासणी फीस पत्रकार, त्यांचे आई, वडील, पत्नी आणि मुलं यांना माफ असणार आहे. त्यासाठी पत्रकारांना आरोग्य सदभावना कार्ड दाखवणे बंधनकारक असणार आहे. पत्रकारांना कार्ड हवे असतील तर त्यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क करून असे कार्ड प्राप्त करून घ्यावेत, असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले. खासगी दवाखान्यातील फिसमध्ये आयएमएच्या सदस्यांनी 100 टक्के सवलत दिलेली आहे. जिल्ह्यातील आयएमएच्या सदस्यांनी पत्रकारांनी कार्ड दाखवल्यावर सवलत देऊन सहकार्य करावे. याशिवाय पत्रकार किंवा त्यांच्या नातेवाईकांना कुठल्या मोठ्या शस्त्रक्रीयेची गरज पडल्यास जिल्हा रुग्णालयात या शस्त्रक्रीया मोफत करण्यात येतील. त्यासाठी कुठलेही चार्ज आकारले जाणार नाही. जिल्हा रुग्णालयात त्या संबंधी औषध गोळ्या उपलब्ध नसतील किंवा त्या संबंधीचे तज्ज्ञ डॉक्टर नसतील तर आम्ही बाहेरून डॉक्टरांना बोलावून घेऊन अशा शस्त्रक्रीया जिल्हा रुग्णालयात करवून घेऊ. पत्रकार हा समाजाचा घटक असून तो नेहमी समाजासाठी रस्त्यावर असतो. सामाजिक बांधीलकी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या मराठवाडा अधिवेशनात समारोप प्रसंगी दिली.
COMMENTS