Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांचा बोगस टेंडरचा महाघोटाळा

सा.बां.विभागातील मध्य मुंबई वरळी विभागात भ्रष्टाचाराचा धुडगूस

मुंबई ः वरिष्ठ पदावर असणार्‍या अधिकार्‍याने जनताभिमुख निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र पदावर असल्यामुळे जितके ओरबाडून खाता येईल, तितके खावे असाच

रत्नागिरी सा.बां.ची ‘निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर’वर ‘अर्थ’पूर्ण कृपादृष्टी !
मागासवर्गीय संस्थांच्या विरोधात महाधिवक्तांना उतरवणे योग्य का ?
पी.एचडी फेलोशीप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनावर येणार गदा

मुंबई ः वरिष्ठ पदावर असणार्‍या अधिकार्‍याने जनताभिमुख निर्णय घेणे अपेक्षित असते. मात्र पदावर असल्यामुळे जितके ओरबाडून खाता येईल, तितके खावे असाच नवा पायंडा मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळा अंतर्गत येणार्‍या मध्य मुंबई वरळी विभागात कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील पाडतांना दिसून येत आहे. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करण्यात त्यांनी कोणतीही हयगय केली नसून जितके ओरबाडून घेता येईल तितके त्यांनी पदरात पाडून घेण्याचा संकल्प केल्याचे दिसून येत आहे.
कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी वरळी पोलिस लाईनमधील उपअभियंता पन्हाड यांना हाताशी धरून वरळी पोलिस लाईन, पोलिस वसाहतीतील निवासस्थाने, पोलिस कार्यालये, पोलिस इमारती यावर देखभाल दुरूस्ती, विशेष दुरूस्ती, रंगरंगोटीच्या कामासाठी खोटी बोगस बिले अदा करण्यात आली आहे. त्यासाठी 60-40 टक्केवारीचा रेषो वापरण्यात आला आहे. वास्तविक ठेकेदारांनी कामे न करता, सर्व खोट्या नोंदी करून, बोगस कामे दाखवून ही बिले काढण्यात आली आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून, कोट्यावधींची उलाढाल झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी शासनाचा आणि सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशांचा अक्षरक्षः चुराडा कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी चालवला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने चौकशी समिती नेमून या गैरकारभाराची चौकशी केल्यास हा कोट्यावधींचा भ्रष्टाचार पुन्हा एकदा उजेडात येण्याची शक्यता आहे.

आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करून कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी बोगस कामांना मान्यता देवून, त्यापोटी ठेकेदारांकडून बोगस कागदपत्रांना मान्यता देण्याचा सपाटा लावला आहे. त्यासोबतच टेस्ट रिपोर्ट देखील बनावट जोडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बोगस कामांना अधिकृत करण्याचे काम कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील करतांना दिसून येत आहे. या बोगस कामांपोटी त्यांनी ठेकेदारांकडून कोट्यावधींची खैरात मिळवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांची चौकशी केल्यास बोगस टेंडरचा महाघोटाळा उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.

या विभागातील उपविभागीय अभियंता यांना हाताशी धरून चांगलाच आर्थिक धुडगूस घातला असून, बोगस देयके देण्याचा सपाटाच लावला आहे. ठेकेदारांशी संगनमनत करून त्यांच्याकडून 30 टक्क्यांच्या रूपात लाचेची मागणी करत बोगस देयके अदा करून कोट्यावधींचा आर्थिक मालमत्ता करण्याचा धडाकाच कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी लावला आहे. या संपूर्ण बोगस टेंडर घोटाळ्यात बोगस नोंदी आणि बोगस टेंडर काढून देयके अदा करण्यात आली आहेत. बनावट अंदाजपत्रके सादर करून, बोगस कामे करून, कामे केल्याचे भासवण्यात आले आहे. तसेच टेस्ट रिपोर्ट बोगस आणि काम केल्याचे बनावट फोटो सादर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी महत्वाची भूमिका निभावली असून, त्यामध्ये कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याप्रकरणाची सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौकशी समिती नियुक्त केल्यास मोठा बोगस टेंडरचा महाघोटाळा उघडकीस येवू शकतो.

जनहित याचिका करणार दाखल – सा.बां.विभागातील मध्य मुंबई वरळी विभागात कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी भ्रष्टाचाराचा महाघोटाळा केला असून, ती रक्कम कोट्यावधींच्या घरात आहे. हा भ्रष्टाचाराचा आलेख सतत उंचावणारा आहे. त्यामुळे मुख्य सचिव, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या संपूर्ण प्रकरण गंभीरतेने घेवून चौकशी करावी अन्यथा या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे यांनी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

उद्याच्या अंकात वाचा कव्हर स्टोरी – दादर उपविभाग उपअभियंता बापट, हाफकिन उपविभागाचे दिलीप हिंगे, बीडीडी चाळ उपविभागाचे अधीक्षक आंबवडे आणि सी.एन.पाटील यांची कव्हर स्टोरी वाचा उद्याच्या अंकात

COMMENTS