Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयात उत्कृष्ट व्यवस्था.उत्कृष्ट कार्यप्रणाली, स्वच्छता, डॉक्टर टीमच विशेष लक्ष. न्या.हेमंत महाजन

डॉ. सुरेश साबळे व त्यांच्या डॉक्टर टीम व आरोग्य कर्मचारी यांचे केले कौतुक.

बीड प्रतिनिधी -जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा दिली जात नाही असा फक्त बोभाटा केला जातो. बीड जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर सुरेश साबळे यांनी जि

नगरच्या मध्यवस्तीतील दोन घरे चोरट्यांनी फोडली
शासकीय कार्यालये आज बंद करण्याचा खा. लंके यांचा इशारा
खिंडवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

बीड प्रतिनिधी -जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा दिली जात नाही असा फक्त बोभाटा केला जातो. बीड जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर सुरेश साबळे यांनी जिल्हा रुग्णालयाचा पदभार घेतल्या पासून आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीकडे लक्ष ठेवत गोरगरीब रुग्णांना चागंली रुग्ण सेवा मिळावी यासाठी रात्रंदिवस काम करताना दिसून येत आहेत. बीड जिल्ह्याचे प्रमुख. जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांनी आपल्या हातावर जिल्हा रुग्णालयात येऊन शस्त्रक्रिया व उपचार घेतले. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णसेवा बाबतीत त्यांनी उत्कृष्ट व्यवस्था, उत्कृष्ट कार्यप्रणाली, उत्तम स्वच्छता, डॉक्टर टीम वर्कच चांगलं काम म्हणत सर्वांचं कौतुकही केलं.  बीड जिल्हा रुग्णालयात  प्रामुख्याने शस्त्रक्रिया विभाग , लेबर रूम, अपघात विभाग, आतिदक्षता विभाग. डायलेसिस. लॅब टेस्ट. सिटीस्कॅन, सोनोग्राफी   या सर्वच विभागातील आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक रुग्णाला रुग्ण सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. जिल्हा रुग्णालयात  सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही रुग्णावर उत्तम उपचार केले जात आहेत तर आवश्यकता प्रमाणे दररोज  शस्त्रक्रिया ही केल्या जात आहेत.काल जिल्हा शल्य चिकित्सा डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली  बीड जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांच्या हातावर  आर्थोपेडिक. डॉक्टर प्रवीण देशमुख, डॉक्टर विजय कट्टे, भुलतज्ञ डॉक्टर मोराळे, घुले ब्रदर, यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांना संध्याकाळी डिचार्ज देण्यात आला.  यावेळी पत्रकार- ज्ञानोबा वायबसे  ओटी इन्चार्ज उबाळे सिस्टर, मेट्रन रमा गिरी. बॉडीगार्ड सय्यद, नितीन काकडे,यांची उपस्थिती होती. बीड जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी  जिल्हा रुग्णाच्या प्रत्येक वार्डसह  शस्त्रक्रिया विभाग, आयपीडी विभाग व ओपीडी विभागात उपचार करून घ्यावे.  तसेच बीड जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त शासकीय रुग्णायालात उपचार घेऊन आपली आर्थिक होणारे नुकसान टाळावे. असे आव्हान ही डॉक्टर सुरेश  साबळे यांनी यावेळी केले.

COMMENTS