Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरातील शिबिरात 135 रुग्णांची तपासणी

एसजेएस आणि ब्राह्यण सभेच्यावतीने केले होते शिबिराचे आयोजन

कोपरगाव शहर ः ब्राह्यण सभा, कोपरगाव आणि श्री जनार्दन स्वामी हॉस्पीटल कोपरगाव यांच्या संयुक्त विदयमाने कै.पुरुषोत्तम को-हाळकर यांचे स्मरणार्थ कोपर

आमदार संग्राम जगताप अडचणीत… फसवणुकीचा गुन्हा होणार दाखल
मतदारसंघाशी नाळ घट्ट करण्यासाठी आ. रोहित पवारांकडून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आधार
कत्तलीसाठी नेणार्‍या सहा जनावरांची पोलिसांनी केली सुटका

कोपरगाव शहर ः ब्राह्यण सभा, कोपरगाव आणि श्री जनार्दन स्वामी हॉस्पीटल कोपरगाव यांच्या संयुक्त विदयमाने कै.पुरुषोत्तम को-हाळकर यांचे स्मरणार्थ कोपरगांव शहरातील सर्वासाठी सर्व रोग निदान शिबिर रविवार दिनांक 25फेब्रुवारी आयोजित शिबिराचे उदघाटन प्रसिध्द उदयोजक नरेंद्र तथा बाळासाहेब कुर्लेकर यांचे हस्ते उद्घाटन होऊन कोपरगांव गॅस कंपनीचे चालक अविनाश सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ऐश्‍वर्यालक्ष्मी सातभाई, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, एस.जे.एस. हॉस्पीटलचे व्यवस्थापक लक्ष्मण बागडे, जगमोहन चिकटे, संजय कुलकर्णी, वनिता मंडळाच्या अध्यक्षा वंदना चिकटे, सुनिता कोर्‍हाळकर आदिच्या उपस्थिततीत संपन्न झाले.
         या शिबिरांमध्ये रक्तदाब, शुगर, 2 डीईको, इसीजी, नेत्रविकार, फीजिओथिरेपी, इत्यादी तपासणी करण्यात आल्या. तर भगवान परशुराम  यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करुन शिबिराची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद कोर्‍हाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर्या महाजन यांनी केले तर आभार उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांनी मानले.या शिबिरात 135 रुग्णांनी घेतला लाभ श्री जनार्दन स्वामी हॉस्पीटलच्या वैदयकीय पथकांमध्ये डॉ.लक्ष्मण  बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली  डॉ. सिद्धेश भोईर, डॉ. सिंग, डॉ. आकांक्षा कुलकर्णी, डॉ.जगदाळे, डॉ.मनीषा सपकाळ, डॉ. अनिरुद्ध उबाळे तसेच वैदयकीय विभागाचे प्रमुख तुषार कोतकर आदींचा समावेश होता. तर शिबिर यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष राजेंद्र जवाद सचिव सचिन महाजन, खजिनदार जयेश बडवे, सहखजिनदार योगेश कुलकर्णी, संघटक महेंद्र कुलकर्णी, कार्यकारीणी सदस्य वसंतराव ठोबरे, संजीव देशपांडे, डॉ.मिलिंद धारणगांवकर, अनिल कुलकर्णी, अ‍ॅड. श्रध्दा जवाद, अजिंक्य पदे, सदाशिव धारणगांवकर आदिनी विशेष परीश्रम घेतले.

COMMENTS