नाशिक प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्य
नाशिक प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून येणाऱ्या परीक्षांच्या दिवसांसाठी प्रोत्साहित केले नाशिक शहरातील भोसला मिलिटरी स्कूल येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रक्षेपित केलेल्या या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार या उपस्थित होत्या पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानंतर भोसला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची संवाद साधताना डॉ भारती पवार म्हणाल्या की कोणत्याही परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत आवश्यक असते आयुष्यात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आत्तापासूनच ध्येय निश्चिती करावी लागेल आणि तसे करताना शालेय जीवनातील शिस्त आणि चांगल्या सवयी महत्त्वपूर्ण ठरतील कोणतीही प्रलोभने पुढे आली तरी विद्यार्थ्यांनी शिस्त मोडू नये कारण या शिस्तीच्या मुळेच जीवनामध्ये पुढे जाऊन यश मिळवता येते मिळवता येते आत्मनिर्भर भारताचे भविष्य म्हणून पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या कडे पाहतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी न घाबरता पुढे जायचे आहे आणि वेळेच्या सदुपयोग करायचा आहे आपल्या देशासाठी आपला काही उपयोग झाला पाहिजे ही भावना खूप मोठी आहे.
यावेळी दिपक खैरनार, मनिषा बोडके, हेमंत रावले, यतीन पवार, काशिनाथ गुंजाळ, बाळासाहेब चौधरी,जगन धूम,अविनाश भिडे, हेमंत देशपांडे, मिलिंद वैद्य, आनंद देशपांडे, राजेंद्र जगताप सह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS