Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी आ. घुलेंकडून स्वंयभू काळेश्वराची महापूजा

भातकुडगाव फाटा : श्री. क्षेत्र गुंफा येथील देवस्थानच्या विकासामध्ये आधुनिकता आणून देवस्थान परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सोय झाली पाहिजे, ग्रामीण भागातील मुलांना अभ्यासिका उपलब्ध करण्याकरिता ई – ग्रंथालयची संकल्पना ही आपल्याला साकार करायचे आहे. यासाठी आपला प्रयत्न आहे. यापुढील काळात स्वयंभू काळेश्वर देवस्थानच्या विकासासाठी घुले कुटुंब कटिबद्ध आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.  शेवगाव-नेवासा राजमार्गावरील गुंफा येथील स्वयंभू काळेश्वर देवस्थानमध्ये माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील व  राजश्री घुले यांनी महाशिवरात्री निमित्त महापूजा करून महाआरती केली. त्यानंतर उपस्थिततांशी संवाद साधला.  यावेळी श्री.क्षेत्र नेवासा देवस्थानचे वेदांताचार्य महंत देविदास म्हस्के शास्त्री, प्रभाकर महाराज कावले, देवस्थानचे लहानू महाराज कराळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक मेरड, माजी सरपंच शंकरराव नारळकर, बक्तरपुरचे सरपंच राहुल बेडके, बाळासाहेब काळे, सखाराम लव्हाळे यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते.  दरम्यान, स्वयंभू काळेश्वर देवस्थानचे जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित झाल्या नंतर गुंफा येथे स्थापना करण्यात आली. स्व. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनीही या देवस्थानच्या विकासासाठी भरघोस मदत केलेली आहे. पुढील काळात चंद्रशेखर  घुले पाटील यांनीही देवस्थानला ‘क ‘ वर्ग दर्जा मिळवून देऊन देवस्थान परिसरातील विकासात भरघोस मदत केली आहे. या पुढील काळात हे देवस्थान ‘ब’ वर्ग मध्ये समाविष्ट करावे. यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भातकुडगावचे माजी सरपंच व देवस्थान ट्रस्टचे प्रमुख शंकरराव नारळकर यांनी केली.याही मागणीला घुले यांनी सकारात्मकता दर्शविली.

भविनिमगावात शिवजयंतीनिमित्त शालेय वस्तूंचे वाटप
भातकुडगाव फाट्यावरील आंदोलनामुळे वाहतूक कोंडी
धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा : शेवगाव तहसीलदारांकडे नागरिकांची मागणी

भातकुडगाव फाटा : श्री. क्षेत्र गुंफा येथील देवस्थानच्या विकासामध्ये आधुनिकता आणून देवस्थान परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सोय झाली पाहिजे, ग्रामीण भागातील मुलांना अभ्यासिका उपलब्ध करण्याकरिता ई – ग्रंथालयची संकल्पना ही आपल्याला साकार करायचे आहे. यासाठी आपला प्रयत्न आहे. यापुढील काळात स्वयंभू काळेश्वर देवस्थानच्या विकासासाठी घुले कुटुंब कटिबद्ध आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले.

 शेवगाव-नेवासा राजमार्गावरील गुंफा येथील स्वयंभू काळेश्वर देवस्थानमध्ये माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील व  राजश्री घुले यांनी महाशिवरात्री निमित्त महापूजा करून महाआरती केली. त्यानंतर उपस्थिततांशी संवाद साधला.

 यावेळी श्री.क्षेत्र नेवासा देवस्थानचे वेदांताचार्य महंत देविदास म्हस्के शास्त्री, प्रभाकर महाराज कावले, देवस्थानचे लहानू महाराज कराळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक मेरड, माजी सरपंच शंकरराव नारळकर, बक्तरपुरचे सरपंच राहुल बेडके, बाळासाहेब काळे, सखाराम लव्हाळे यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते.

 दरम्यान, स्वयंभू काळेश्वर देवस्थानचे जायकवाडी प्रकल्पामुळे विस्थापित झाल्या नंतर गुंफा येथे स्थापना करण्यात आली. स्व. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनीही या देवस्थानच्या विकासासाठी भरघोस मदत केलेली आहे. पुढील काळात चंद्रशेखर  घुले पाटील यांनीही देवस्थानला ‘क ‘ वर्ग दर्जा मिळवून देऊन देवस्थान परिसरातील विकासात भरघोस मदत केली आहे. या पुढील काळात हे देवस्थान ‘ब’ वर्ग मध्ये समाविष्ट करावे. यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने भातकुडगावचे माजी सरपंच व देवस्थान ट्रस्टचे प्रमुख शंकरराव नारळकर यांनी केली.याही मागणीला घुले यांनी सकारात्मकता दर्शविली.

COMMENTS