Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार म्हणून जबाबदारी पार पाडा ः आ. मोनिका राजळे

पाथर्डी/प्रतिनिधी ः तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण स्वतः उमेदवार म्हणून बाजार समिती निवडणुकीत आपली जबाबदारी पार पाडावी, बाजार समिती जिं

संभाव्य वादळ व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी- तहसीलदार चंद्रे
बाबासाहेब शेलार यांचा नागरी सत्कार
 जामखेडमध्ये घरफोडी – लाखोंचा ऐवज लंपास

पाथर्डी/प्रतिनिधी ः तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपण स्वतः उमेदवार म्हणून बाजार समिती निवडणुकीत आपली जबाबदारी पार पाडावी, बाजार समिती जिंकुन पुन्हा गतवैभव मिळवुन देवुन जिल्ह्यासह राज्यात आदर्श ठरेल असे काम आपण करू. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारची प्रत्येक बाजार समितीत शेतकरी निवारा ही अत्यंत चांगली संकल्पना असून ती प्रभावी पणे राबविली जाईल, असे आश्‍वासन आमदार मोनिका राजळे यांनी दिले. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणीत आदिनाथ शेतकरी मंडळच्या वतीने विठोबाराजे मंगल कार्यालयात तालुक्यातील विकास सेवा संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी, हमाल, मापाडी, शेतकरी, मतदार, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
आपल्या ताब्यात असणार्‍या सर्वच संस्था वृध्देश्‍वर कारखाना, खरेदी विक्री संघ चांगल्या प्रकारे सुस्थितीत असून  प्रगतीपथावर कार्यरत आहेत. मात्र विरोधकाच्या ताब्यात असलेली एकमेव बाजार समिती कशी सुरु आहे हे आपण गेल्या सात वर्षात अनुभवले आहे. त्यांच्या कारभाराबाबत न बोललेच बरे. गेल्या वेळी बाजार समितीची निवडणूक अचानक लागली. माजी आमदार स्व.राजीव राजळे आजारी होते मी पण राजकारणात नवीन होते घाई घाईत काही चुका झाल्या असतील. बाजार समितीची सत्ता विरोधात गेली त्यांना चांगले काम करण्यासाठी विरोधकांना मोकळीक दिली. शेतकरी व्यापारी हिताचे निर्णय होतील अशी त्यामागे अपेक्षा होती मात्र सात वर्षात कसा कारभार केला हे आपणास माहिती आहे.आता पुन्हा तशी वेळ येवु देवु नका. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी जि.प. सदस्य राहुल राजळे, अर्जुन शिरसाट, पुरुषोत्तम आठरे, विठ्ठलनाना खेडकर, माजी सभापती गोकुळ दौंड, उद्धव वाघ, काकासाहेब शिंदे, मिर्झा मणियार, रामकिसन काकडे, अशोक चोरमले, नंदकुमार शेळके, भिमराव फुंदे, विष्णुपंत अकोलकर, ज्योती मंत्री, सिंधुबाई साठे, जे.बी.वांढेकर,आदी उपस्थित होते. यावेळी अभय आव्हाड, गोकुळ दौंड, उद्धव वाघ, भिमराव फुंदे, रविंद्र वायकर, भगवान आव्हाड सुभाष बर्डे यांनी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत बाळासाहेब अकोलकार,सुत्रसंचालन राजी सुरवसे यांनी तर आभार माजी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे यांनी मानले.

COMMENTS