बंडखोर आमदारांसह संपर्क प्रमुखाच्या प्रतिमेलाही…आगीची झळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंडखोर आमदारांसह संपर्क प्रमुखाच्या प्रतिमेलाही…आगीची झळ

नगरमध्ये शिवसेनेकडून पुतळ्यांचे दहन, पोलिसांनी काही पुतळे वाचवले

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले आमदार एकनाथ शिंदेंसह 16जणांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे जिल्हा व शहर शिवसेनेने मंगळवारी दुपारी दोनच्

खा. प्रितम मुंडे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय उद्घाटन
जुनी पेंशन रद्द करण्याच्या अध्यादेशाची होळी
गणेश अंबिलवादे यांचा व्हिजन महाराष्ट्र दिवाळी अंक प्रकाशित

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले आमदार एकनाथ शिंदेंसह 16जणांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे जिल्हा व शहर शिवसेनेने मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास बुरुडगाव रो़़ड़वरील नक्षत्र लॉन्समध्ये दहन करताना कुत्रे, बाटगे, गद्दार अशी शेलकी विशेषणे बहाल करीत त्यांचा जोरदार निषेध केला. दरम्यान, पक्षाचे विद्यमान नगर जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांची प्रतिमाही या पुतळ्यावर टाकल्याने तिलाही आगीची झळ बसली. स्थानिक राजकारणात शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोरगावकरांकडून होणारा त्रास या निषेधातून व्यक्त झाल्याने तो चर्चेचा झाला आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मागील आठ दिवसांपासून राज्यभरात वातावरण तापले आहे. या तुलनेत नगर जिल्हा तसा शांत होता. मात्र, या शांततेचा मंगळवारी उद्रेक झाला आणि जिल्हा व शहर शिवसेनेने एकनाथ शिंदे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे व अन्य मिळून 16जणांचे प्रतीकात्मक पुतळे जाळले. आधी शिवसेना पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात या सर्वांना गद्दार संबोधून त्यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यानंतर मोकळ्या लॉनमध्ये राम बोलो भाई राम…जय जय राम…म्हणत या पुतळ्यांची अंत्ययात्रा काढली. त्यावेळी या पुतळ्यांना लावलेल्या या आमदारांच्या फोटोंवर चपलांचा प्रहार सुरू होता. अचानक कोणीतरी एक पुतळा खाली टाकला, त्याच्यावर पेट्रोल टाकले गेले आणि तो पेटवून दिला गेला. त्यानंतर धपाधप बाकीचे पुतळे त्यावर टाकल्याने आगीचा लोळ उसळला. त्याची धग या पुतळ्यांजवळ असणारांना बसली. त्यानंतर काठीने या पुतळ्यांना बदडले गेले. तोपर्यंत उपस्थित पोलिसांनी काही पुतळे ताब्यात घेऊन ते आगीत पडण्यापासून वाचवले व नंतर जळालेले पुतळेही गोळा करून बाजूला नेऊन टाकले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांच्या उद्धव ठाकरे, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है…अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

कोरगावकरांवर निघाला राग
शिवसेनेच्या मेळाव्यात काहीजणांनी विद्यमान संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांची नगर जिल्ह्याला गरज नाही, त्यांनी सगळ्यांनाच खूप त्रास दिला आहे, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. त्याचेही पडसाद पुतळा जाळताना उमटले. सभेच्या फ्लेक्सवर असलेला फक्त कोरगावकरांचाच फोटो कापून कोणीतरी जळत असलेल्या पुतळ्यांमध्ये टाकून निषेध व्यक्त केला. पोलिसांनी नंतर तो फोटोही ताब्यात घेऊन जळालेल्या पुतळ्यांजवळ टाकून दिला. मात्र, गद्दार आमदारांसमवेत कोरगावकरांचीही प्रतिमा जाळली गेल्याने तो चर्चेचा विषय मात्र झाला.

COMMENTS