Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोरगा झाला तरी माझ्यामुळेच…

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये वर्षानुवर्षे पावसाळ्यात तीन ते चार महिने मुंबईच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे असतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या महा

मुंबईत मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात
बाबासाहेब कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
आयटीआयमध्ये पाटण येथील मनिष जाधव तालुक्यात प्रथम

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईमध्ये वर्षानुवर्षे पावसाळ्यात तीन ते चार महिने मुंबईच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे असतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या महानगरपालिकेकडे एवढे पैसे आहेत त्यांच्याकडून चांगले रस्ते करण्याचे काम होत नाही, मात्र विरोधकांकडून काही झाले तरी, माझ्यामुळेच झाल्याचे बोलले जाते. एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला, कोणाचे लग्न झाले तरी माझ्यामुळेच झाले, नोकरी लागली तरी माझ्यामुळेच लागली. एखाद्याला सवयच असते काहीही केले तरी मीच केले म्हणतात. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मुंबईच्या कायापालट प्रकल्पाच्या तिसर्‍या टप्प्याचे भूमिपुजन आज करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, मुबईच्या कायापालट कार्यक्रमाच्या तिसर्‍या टप्प्यात 320 कामाचे भूमिपूजन होत असून ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मुंबई ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. महानगरपालिकेतील पैसा बँकेत ठेवण्यासाठी नाही. तो जनतेचा पैसा आहे आणि जनतेसाठी वापरा असे निर्देश आयुक्त इकबाल चहल यांना आम्ही दिले आहेत असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केले असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षांच्या कार्यकाळात दोन वर्षे दरवाजाच्या आतच होते. त्यांनी 6 महिन्यांच्या काळात काय विकास केला? तुम्ही काहीच केले नाही म्हणून तर आज मुंबईची ही अवस्था झाली आहे. फडणवीस म्हणाले, महापालिका बँकेत पैसा गुंतवून त्यांच्या इंटरेस्टवर जगण्यासाठी निर्माण झाली नाही. तर महापालिका जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरण्याकरीता असते. म्हणून जनतेचा पैसा जनतेसाठी लावा, असे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले. मुंबईतील ज्या समस्या आहेत. त्या दूर कशा करता येईल याचे प्रकल्प आम्ही सुरू केले आहेत. दर पावसाळ्यात किंवा त्या दरम्यान तीन ते चार महिने माध्यमांमध्ये केवळ मुंबईतील खड्ड्यांची चर्चा असते. मुंबईच्या खड्ड्यांवर जेवढे मिम्स तयार होतात, तेवढे कोणत्याही गोष्टीवर होत नाही. ज्या महापालिकेकडे इतका पैसा आहे. 25 वर्ष राज्य करूनही रस्ते दुरुस्त करता येत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

आगामी 2 वर्षात मुंबई खड्डेमुक्त करू – मुंबईचा वेगाने विकास करायचा असून, आगामी 2 वर्षात मुंबई खड्डेमुक्त करू, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन वर्षात हे काम होऊ शकते तर 25 वर्ष राज्य करणार्‍यांना सवाल का विचारू नये? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.फडणवीस यांनी यावेळी मुंबईकरांची क्षमा मागितली. ते म्हणाले, आम्ही एकाचवेळी अनेक कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होणार आहे. त्यामुळेच मुंबईकरांची क्षमा मागायची आहे. एकावेळी अनेक कामे घेतल्याने प्रदूषण होत आहे. ट्रॅफिक जाम होत आहे. पण काळजी करू नका. दोन तीन वर्षात ही कामे झाली की पुन्हा त्रास होणार नाही. नंतर 30 ते 40 वर्ष त्याकडे बघण्याची गरज पडणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS