Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षणापासून देवही रोखू शकत नाही

मनोज जरांगेंचा अंतरवाली सराटीतून इशारा

जालना ः सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करावे ही आपली मागणी असून, सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्या

विधानसभेला आणखी फजिती करू
सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर ठाम
शिक्षण, नोकर्‍यांसह राजकीय आरक्षण सुद्धा घेणार

जालना ः सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करावे ही आपली मागणी असून, सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात एक तासही कमी होणार नाही. 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, याचा अर्थ मराठा ओबीसीमध्ये आहे. 1967 पूर्वी मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आधी आरक्षण द्यायला हवे होेते. ओबीसी आरक्षण त्यानंतर देण्यात आले. जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून देव सुद्धा रोखू शकत नाही. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीतून दिला आहे.
ओबीसीमध्ये धनगर समाजाला वेगळा प्रवर्ग आहे. त्यामुळे त्यांना धक्का लागणार नाही. आपण ओबीसीमध्ये आहोत फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. मराठ्यांना इतक्या हल्क्यात घेऊ नका, मतांसाठी आमच्या पोरांचे मुडदे पडणार नाहीत याची काळजी घ्या. तुन्हाला मोठे करायचे मराठ्यांनी आणि त्यांनीच आरक्षण देणार नाही, अशी टीका त्यांनी राजकीय नेत्यांवर केली आहे. आता ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्या नोंदींच्या आधारावर कायदा करावा, यासाठी 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितला होता. ते शब्द आपले नाहीत, ते त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे 24 डिसेंबरपर्यंत त्या नोंदीच्या आधारावर आरक्षण दिले पाहिजे आणि आम्ही ते आम्ही घेणारच, असा निर्धार त्यांनी केला आहे. आंदोलनाची दिशा काय यावर चर्चा करायची आहे. आता हार आपल्याला घ्यायची नाही, असे आवाहन मराठा समाजाला त्यांनी यावेळी केले.

COMMENTS