‘प्राप्तीकर रिटर्न’मधील चुकांची करता येणार दुरूस्ती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘प्राप्तीकर रिटर्न’मधील चुकांची करता येणार दुरूस्ती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर रिटर्न संबंधी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. करदात्यांकडून इन्

औषध खरेदीच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक 
अभिनेत्री जुई गडकरी अडकणार लग्नबंधनात
सीएनजी अडीच रुपयांनी महागला

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर रिटर्न संबंधी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. करदात्यांकडून इन्कम टॅक्स रिटर्नचा फॉर्म भरताना एखादी चूक झाली तर त्यांची चौकशी होत होती. आता यापुढे ते बंद होणार असून त्यात गेल्या दोन वर्षातील चुकांची सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार आहे.
या संबंधी घोषणा करताना निर्मला सीतारामण म्हणाल्या की, या पूर्वी आयकर परतावा फाईल म्हणजे आयकर रिटर्न भरताना काही चूक झाली तर त्या करदात्याची चौकशी करण्यात येत होती. पण आता केंद्र सरकारने या करदात्यांवर पूर्ण विश्‍वास ठेवण्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पुढे काही चुका झाल्या तर त्याची चौकशी होणार नाही. त्या चुकामध्ये सुधारणा करण्यासाठी मुभा देण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. केंद्र सरकारचा हा निर्णय लाखो करदात्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याच सोबत केंद्र सरकारने सहकारी सोसायट्यांसाठी असणारा किमान पर्यायी कर टॅक्स हा 18.5 टक्क्यांवरून 15 टक्के इतका करण्यात आला आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठीचा एनपीएस यावर्षीपासून समान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, प्राप्तीकर भरणार्‍यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. या वर्षीही कर रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे.

COMMENTS