Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपुरात ओमान एअरलाईन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

नागपूर : ओमान येथील सलाम एअरलाईन्सच्या विमानाचे बुधवारी रात्री नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बांगलादेशच्या चातगावहून मस्कतला जाणार्‍या य

अफगाणच्या आड पानिपतची तयारी तर नाही ना ?
लोकल रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरले
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतले खंडोबाचे दर्शन

नागपूर : ओमान येथील सलाम एअरलाईन्सच्या विमानाचे बुधवारी रात्री नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बांगलादेशच्या चातगावहून मस्कतला जाणार्‍या या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान आपातकालिन परिस्थितीत नागपुरात लँड करावे लागले. या विमानातील सर्व 200 प्रवास आणि 7 क्रू मेंबर्स सुखरूप आहेत.
विमानतळ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलाम एअरलाईनच्या विमानाचे बुधवारी (1 मार्च) रात्री नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैमानिकाला विमानाच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याचे आढळून आले होते. हे विमान बांगलादेशातील चातगाव येथून मस्कतला जात होते. विमान भारतीय हवाई हद्दीत असताना त्याच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे आढळले. त्यानंतर विमान नागपूर विमानतळाच्या दिशेने वळवण्यात आले. विमानतळ कर्मचार्‍यांनीही वेळेत सर्व तयारी केली आणि विमानाची सुरक्षित इमर्जन्सी लँडीग करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास आणि चौकशी सुरू आहे.

COMMENTS