Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजेचा दाब वाढल्याने विद्युत उपकरणे जळून खाक

पालघर/प्रतिनिधी : पालघर विद्युत महावितरण विभागाचा भोंगळ कारभाराचा फटका सफाले उंबरपाडा हद्दीतील मालकरीपाडा येथील वीज ग्राहकांना बसला आहे. मंगळवारी

विमानामध्ये एअर होस्टेसचा विनयभंग
जितेंद्रकुमार राठौर यांना पीएच.डी
लवकरच राज्य परिवहन विभागाच्या गाड्यांचे 142 महिलांच्या हाती स्टेअरिंग

पालघर/प्रतिनिधी : पालघर विद्युत महावितरण विभागाचा भोंगळ कारभाराचा फटका सफाले उंबरपाडा हद्दीतील मालकरीपाडा येथील वीज ग्राहकांना बसला आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अचानक विद्युत वाहिनीवरील विजेचा दाब वाढल्याने अनेकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाली. सफाले उंबरपाडा हद्दीतील मालकरीपाडा येथे पहाटेच्या सुमारास अचानक विद्युत वाहिनीवरील विजेचा दाब वाढला. यामुळे घरांमधील वीज मीटर जळून खाक झाले आहेत. दुसर्‍या बाजूला घरात असलेल्या फ्रीज, टीव्हीसह इतर विद्युत उपकरणे देखील जळाली. गेल्या अनेक महिन्यांपासून या विद्युत वाहिनीचा मेंटेनन्स न केल्याने हा विद्युत दाब अचानक वाढल्याचा येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

COMMENTS