Homeताज्या बातम्यासंपादकीय

निवडणुका आणि लोकांचा सहभाग

भारतातील लोकशाहीचा पुढील वर्षी अमृतमहोत्सवी वर्षाला सुरूवात होणार आहे. भारतीय लोकशाही 75 वर्षांच्या कालावधीत चांगलीच तावून सुलाखून निघतांना दिसून

केरळमध्ये आभाळ फाटलं
सत्तेसाठीच सारे काही !
दाभोळकर हत्या तपास आणि न्याय

भारतातील लोकशाहीचा पुढील वर्षी अमृतमहोत्सवी वर्षाला सुरूवात होणार आहे. भारतीय लोकशाही 75 वर्षांच्या कालावधीत चांगलीच तावून सुलाखून निघतांना दिसून येत आहे. मात्र देशातील प्रत्येक नागरिकाला आजमितीस तरी लोकशाहीचा अर्थ कळला आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. आपण लोकशाहीनुसार कारभार कसा करावा हे जरूर शिकलो आहे, लोकशाहीनुसार हक्क कसे उपभोगावे याची शिकवण देखील आपल्या कळत-नकळत मिळत आहे. मात्र लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण काय करायला हवे, याचे प्रबोधन अजूनही आपल्यात नाही. खरंतर लोकशाहीच्या संरक्षणासाठी तसेच मतदान करतांना काही तत्व आपण मतदार म्हणून स्वतःला घालून घेतले आहे का. खरंतर निवडणुकीत उभा राहणार्‍यांचे शिक्षण किती, त्याचा समाजात प्रभाव किती, निवडणून आल्यानंतर आपल्या मतदारसंघासाठी कोणत्या विकासाच्या योजना राबवणार आहे, त्याच्याकडे किती दूरदृष्टी आहे, याचा निकष आपण तपासून पाहतो का, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. आपण केवळ झापड लावलेल्या बैलासारखे, चेहरा बघून मतदान करतो. त्याचे शिक्षण, त्याची विकासाची दृष्टी, त्याचे चारित्र्य या कोणत्याच बाबींकडे उघड्या डोळ्यांनी बघत नाही. परिणामी आपण ज्या व्यक्तीला निवडतो, ती व्यक्ती देखील तशीच कामे करतात. त्यामुळे मतदार जर नालायक असेल तर तो निवडून देणारा व्यक्ती देखील त्याच दर्जाचा असतो. त्यामुळे मतदार जर सुज्ञ असेल तर तो सुज्ञ व्यक्तीलाच निवडून देतो. त्यामुळे आपण डोळस होण्याची खरी गरज आहे.

लोकशाहीसाठी आपण सुज्ञ होण्याची खरी गरज आहे. लोकशाहीमध्ये लोकांची ताकद सर्वोच्च आहे. त्यामुळे या ताकदीचा वापर लोकांनी योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे. याच लोकशाहीने अनेक राज्यकर्ते बघितले. मग ते उदारमतवादी असतील, किंवा उजव्या किंवा डाव्या विचारसरणीचे असतील. याच लोकशाहीने अनेक राज्यकर्त्यांना बघितले. त्या राज्यकर्त्यांनी लोकशाहीची व्याख्या आपल्या मनाप्रमाणे करत कारभार हाकण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी राज्यकर्त्यांनी लोकशाहीची प्रतारणा केली, त्यावेळी लोकशाहीने आपली ताकद दाखवून सत्तेचे तख्त बदलण्यास भाग पाडले. याच लोकशाहीने अनेक पंतप्रधानांना कारभार करतांना पाहिले. जर कुणी जुमानत नसेल आणि आपले तख्त धोक्यात आले असेल तर, आणीबाणी लादलेली देखील आपल्या लोकशाहीने पाहिलेली आहे. याच लोकशाहीचा उत्सव सध्या सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान आज सोमवारी होत आहे. लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे. तो एक राज्यघटनेचा व राज्यव्यवस्थेचा प्रकार आहे. सामाजिक जीवनाच्या आवश्यकतेतून आणि अपरिहार्यतेतून जीवन व्यतीत करण्याच्या ज्या काही विचारप्रणाल्या आणि आचारधर्म प्रसृत झाले, त्यांपैकी लोकशाही ही एक आहे म्हणून समाज आणि संस्कृती यांना उद्देशून लोकशाही या शब्दाचा वापर करणे अर्थपूर्ण ठरते. समाज व संस्कृती यांचे वळण जर लोकशाहीपर नसेल, तर लोकशाही पद्धतीचे संविधान स्वीकारूनही त्या देशात लोकशाही रूजणे व टिकणे अवघड जाते. याउलट, एखाद्या देशात लोकशाही पद्धतीने दीर्घकाळ राज्यकारभार चालू असता, त्या देशातील समाजाला व संस्कृतीला लोकशाही वळण प्राप्त होते. अशा प्रकारे या दोन्हींमधील परस्परसंबंध स्पष्ट करता येतो. लोकशाहीचा प्रगल्भ विचार उत्क्रांत होण्यामागे अनुभववादाचा वाटा मोठा आहे. लोकशाही जीवनपद्धती आणि तत्त्वज्ञान यांच्या विकासातील ते एक मूलतत्त्व आहे. यूरोपातील लोकशाहीवादी चळवळी ह्या सामाजिक सुधारणांच्या चळवळी होत्या. त्यांनी लोकशाहीच्या मूल्यांबाबत अनुभववादी तत्त्वज्ञान स्वीकारले. मात्र आपण असे कोणतेही तत्वज्ञान स्वीकारलेले नाही. लोकशाही आपल्याला आयती मिळाली असल्याने आपल्याला तिची किंमत मिळत नाही, त्यामुळे लोकशाहीच्या तत्वज्ञानाच्या संकल्पना देखील आपल्या अपुर्‍या आहेत. त्यामुळे लोकशाहीची वाताहात होतांना दिसून येत आहे. आज सोमवारी पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मतदारसंघाचा समावेश असून, त्यामध्ये मुंबईतील 6 मतदारसंघाचा देखील समावेश आहे. मात्र निवडणुका सुरू असतांना देशामध्ये निवडणूक आयोगाने जवळपास 9 हजार कोटी रूपये जप्त केले आहेत. तब्बल 8889 कोटी रुपये जप्त केले आहेत. आजवर जप्त करण्यात आलेल्या रकमेत अमली पदार्थांच्या जप्तीचा वाटा सुमारे 3958 कोटी रुपये म्हणजे एकूण जप्तीच्या 45 टक्के इतका आहे. त्यामुळे जनतेने पुढाकार घेतल्याशिवाय अनेक बाबी या देशांमध्ये पूर्णत्वास जावू शकणार नाही. 

COMMENTS