शिर्डी/प्रतिनिधी ः साईबाबांच्या हयातीपासून दरवर्षी रामनवमी उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे. यासाठी ग्रामस्थांमधून उत्सव समिती

शिर्डी/प्रतिनिधी ः साईबाबांच्या हयातीपासून दरवर्षी रामनवमी उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे. यासाठी ग्रामस्थांमधून उत्सव समितीचा अध्यक्ष निवडला जात असतांना आता यंदाच्या उत्सव समितीसाठी दोन अध्यक्ष दोन गटांनी निवडले आहे. त्यात एका गटाने संजय शिंदे तर दुसर्या गटाने दीपक वारुळे यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. दोन अध्यक्षांच्या निवडीमुळे उत्सव समितीत दोन वेगवेगळे गट पडलेले दिसून आले आहे. मात्र समन्वयाने हा ही गटबाजी थांबुन लवकरच रामनवमी उत्सव एकजुटीने साजरा करण्यासाठी जुने जाणत्या नेत्यांनी आणि गाव कारभारी प्रयत्नशील असल्याचे ग्वाही दिली आहे.
पहिल्या गटाची बैठक रविवारी ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या निवासस्थानी झाली त्या प्रसंगी माहिती देताना अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले की, रविवारी शिर्डीत ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी शिर्डी ग्रामस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. काही ग्रामस्थ उपस्थिती होते तर काही नव्हते. गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांनी असे ठरवले होते की, गावातील सर्व आडनावाच्या आणि प्रभावी व्यक्तीला उत्सव समितीमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार होती. त्यानुसार कोते, गायके, यांना संधी देण्यात आली होती. म्हणून रविवारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत माझी निवड करण्यात आली. याप्रसंगी अभय शेळके, शिवाजी गोंदकर, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, बाबासाहेब कोते, अशोक गोंदकर, सचिन शिंदे , सचिन कोते, विजय जगताप, सचिन चौगुले, अमृत गायके, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
तर दुसर्या गटाची बैठक सोमवारी सकाळी हॉटेल सिटी हार्ट येथे संपन्न झाली यावेळी अध्यक्ष दीपक वारुळे म्हणाले की, शिर्डीच्या काही ग्रामस्थांना टाळून त्या गटाने बैठकीचे आयोजन केले. त्यांचा अध्यक्ष निवडीचा कट हा पूर्वनियोजित होता. या बैठकीसाठी मावळते अध्यक्ष कमलाकर कोते यांना ही बोलवले नाही. त्यामुळे त्यांनी निवडलेला अध्यक्ष हा ग्रामस्थांच्या एक मताने निवडला गेला नाही. मात्र एक अध्यक्ष निवडला जावा, यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, यावेळी कमलाकर कोते यांनी पूर्व हिशोब देखील सादर केला. तर कार्याध्यक्ष म्हणून जगन्नाथ गोंदकर यांचीही निवड करण्यात आली आहे, असे वारुळे म्हणाले. अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी कैलासबापू कोते, कमलाकर कोते, नितिन कोते, अरविंद कोते, दत्ता कोते, सचिन तांबे, निलेश कोते, ताराचंद कोते, अँड अनिल शेजवळ, उत्तम कोते , हिरामण वारूळे, अशोक कोते, पंडित शेळके,दत्तात्रेय कोते, अप्पासाहेब कोते, यादवराव कोते, नानासाहेब काटकर हरी बनकर बद्रीनाथ लोखंडे,संदीप पारख, गोकुळ ओसवाल, दीपक नागरे ,अँड विक्रम वाकचौरे, केशवराव गायके, राजेंद्र कोते, मनोज वाघ, राकेश कोते ,हैशीराम कोते, सर्जेराव कोते ,नंदू शेळके केशव जाधव, प्रसाद सुरंगे, संजय बनकर , साईराज कोते, बापू ठाकरे, खंडू गोरडे, राजेंद्र पवार ,बाळासाहेब नागरे, देवानंद शेजवळ,आदीसह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.
COMMENTS