Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण तालुका सहकारी दुध संघाची निवडणूक बिनविरोध

फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुका सहकारी दुध संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून यामध्ये राजेगटाचे 15 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. फलटण

सांगली जिल्ह्यातील 4 कारखान्यांची 26 हजार 631 टन होणार निर्यात
दूध उत्पादकांना प्रति लिटर 50 पैसे रिबेट व भेटवस्तू ; राहात्यातील पंचकृष्णा डेअरीने केली दिवाळी गोड
हुमगाव-बावधन रस्ता राजकीय इच्छाशक्ती अभावी अधांतरी..?

फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुका सहकारी दुध संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून यामध्ये राजेगटाचे 15 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. फलटण तालुका सहकारी दुध संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर 15 जागांसाठी 21 उमेवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज 29 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी केवळ 15 उमेदवारी अर्ज राहिल्याने हि निवडणूक बिनविरोध झाली आहे.
या फलटण तालुका सहकारी दुध संघात बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे : धनंजय पवार राजुरी, हनुमंत चव्हाण शेरीचीवाडी, बबनराव निकम फलटण, दत्तात्रय गुंजवटे झिरपवाडी, जगन्नाथ शिंदे कोर्हाळे, संपतराव पवार पवारवाडी, मस्कू अनपट सासवड, डी. के पवार साखरवाडी, दत्तात्रय रणवरे जिंती, राजकुमार बाबर कुरवली बु।, सुरेश रोमन वेळोशी, तानाजी बिबे कांबळेश्‍वर, हनुमंत नेवसे सस्तेवाडी, नंदा फरांदे फरादवाडी, मंगला सस्ते निरगुडी, हे सदस्य बिनविरोध निवडून आले असून विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील ह्या निवडी बिनविरोध झाल्या.

COMMENTS