Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तब्बल अठरा तासानंतर सांगली बाजार समिती परिसरातील गवा पकडला

सांगली / प्रतिनिधी : मंगळवारी पहाटे सांगली शहरात घुसलेल्या गव्याला पकडण्याच प्रयत्न अखेर 18 तासांनंतर यश आले. बुधवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास

श्रीगोंद्यात कायदेभंग…प्रतिबंधित बीटी वांग्याची होणार जाहीर लागवड
महावितरणच्या अधिकार्‍यांची मनमानी; थकबाकी वसूलीसाठी संपूर्ण विज पुरवठा बंद
चिमणी दिनानिमित्त मुक्तांगणच्या प्रांगणात घरटी बनविताना चिव-चिवाट

सांगली / प्रतिनिधी : मंगळवारी पहाटे सांगली शहरात घुसलेल्या गव्याला पकडण्याच प्रयत्न अखेर 18 तासांनंतर यश आले. बुधवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास तो वनविभागाच्या कंटेनरसारख्या वाहनात बंदिस्त झाला. सकाळी नऊच्या सुमारास त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यामुळे सांगलीकरांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला.
गेल्या तीन दिवसांपासून कसबे डिग्रज, सांगलीवाडी परिसरात गव्याचा वावर होता. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याने सांगली शहरात प्रवेश केला. शहरातील मध्यवर्ती भागातील मार्केट यार्डात तो शिरला. प्रशासनाने लगेच हा परिसर पूर्ण बंद करून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मार्केट यार्डातील एका गोदामाजवळचे तीन मार्ग बंद करून बोळाच्या तोंडावर खास मागविण्यात आलेला कंटेनर उभा करण्यात आला. तो इतर मार्गाने बाहेर पडणार नाही यासाठी तिन्ही मार्ग वाहने, पत्रे लावून बंद करण्यात आले होते.
वन विभागाने कोल्हापूर व पुण्याहूनही पथक बोलावले. तीन दिवसांपासून फिरत असल्याने थकलेल्या गव्याला पाच ते सहा तास विश्रांती देण्यात आली. दुपारी तीन नंतर पुन्हा त्यास वाहनात बंदिस्त करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून मागविण्यात आलेल्या वाहनाचे रॅम्प जमिनीच्या पातळीवर लावण्यासह इतर तयारी करण्यास प्रशासनाला रात्रीचे नऊ वाजले.
रात्री दहाच्या सुमारास पुन्हा दोन वाहने आत बोळात गेली. त्याला पुढे-पुढे आणत कंटेनरकडे आणण्याचा प्रयत्न झाले. मात्र, थकलेला गवा कंटेनर समोरच बसत होता. त्यामुळे पुन्हा मोहीम थांबविण्यात आली. रात्री पाऊणच्या सुमारास पुन्हा वाहनांद्वारे त्यास पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर पावणे दोनच्या सुमारास तो कंटेनरमध्ये स्वत:हून चढला. रात्री तीन वाजता पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याची तपासणी केली. त्यास कोणतीही इजा झाली नसल्याचे दिसून आल्यानंतर कंटेनरमधून नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
तीस तासांचा थरारक प्रवास
बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता गव्याला सुरक्षितपणे अधिवासात सोडण्यात आले. यामुळे मंगळवारी पहाटे पाच ते बुधवारी सकाळी साडेनऊ असा तीस तासांचा थरार सांगलीकरांनी अनुभवला. वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, अजितकुमार पाटील, अजित ऊर्फ पापा पाटील यांच्यासह पोलीस, महसूल, अग्निशमन दलांसह सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केले.
एका गव्यासाठी तीन जिह्यांतील रेस्क्यू टीम अठरा तास झटली
नागरी वस्तीत चुकून आलेला हा गवा बुधवारी वन विभागाने नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडला. गवा पकडण्यासाठी वनविभागाचे सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील रेस्क्यू टीमला सलग 18 तास कसरत करावी लागली. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना महसूल आणि पोलीस यंत्रणेने मदत केली. त्यामुळे नागरी वस्तीत घुसलेल्या गव्याला सुरक्षित पकडण्यात यश आले.

COMMENTS