Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची निवड

बीड प्रतिनिधी - अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या बीड जिल्हा सचिव पदी अशोक भिसे तर माजलगाव तालुका उपाध्यक्षपदी सय्यद फारूक यांची एकमताने

प्रेयसीच्या शरीराचे 50 तुकडे करून फेकले जंगलात
 धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव चोरी गेल्याची बुलढाणा पोलिसात तक्रार दाखल
तोतया पोलिसाकडून लाखोंची फसवणूक

बीड प्रतिनिधी – अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या बीड जिल्हा सचिव पदी अशोक भिसे तर माजलगाव तालुका उपाध्यक्षपदी सय्यद फारूक यांची एकमताने निवड करण्यात आली.
संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ आणि जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शेख एजाज़ यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास इंदुरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेश इंदुरकर, राष्ट्रीय सचिव संतोष कुरुडे आणि राज्य प्रसिद्धी प्रमुख शेषराव सोपणे मामा यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली या दोन्ही पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. या निवडीनंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंदुरकर म्हणाले की, बीड जिल्ह्यात युसूफ़भाई व एजाज़ भाई यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना पोलीस कर्मचार्‍यांपासून ते अधिकार्‍यांपर्यंत सर्वांच्या न्याय हक्कासाठी सर्वतोपरी लढा देण्यास बांधील आहे. संघटनेच्या व पत्रकारितेच्या माध्यमातून पोलिसांसाठी आवश्यक ते कार्य करण्यास संघटना सदैव तत्पर आहे असे म्हटले. यावेळी पाटोदा तालुकाध्यक्ष सतीश गर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती.

COMMENTS