Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला बीड जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.मंजुषा दराडे यांची निवड

बीड प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेवरून महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया

पत्नीशी वाद झाल्याने पतीने २ महिन्याच्या मुलीला दिले विहिरीत फेकून | LokNews24
कॉ. कातोरेंवरील हल्ल्याच्या प्रतिकाराबद्दल माकपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक : डॉ. अशोक ढवळे
Rahul Gandhi : मारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणारच (Video)

बीड प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेवरून महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांच्या आदेशावरून, महिला अध्यक्ष माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी बीड विधानसभेचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या शिफारशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला बीड जिल्हाध्यक्षपदी अँड. मंजुषाताई दराडे यांची निवड जाहीर केली आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.अँड. मंजुषाताई दराडे या माजी आमदार उषाताई दराडे यांच्या पावलावर पाऊल टाकत बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत महिलांचे संघटन मजबूत करतील असा विश्वास व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या सूचनेवरून महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीयाताई खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष माजी आ. विद्याताई चव्हाण यांनी बीड विधानसभेचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर यांच्या शिफारसी वरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला बीड जिल्हाध्यक्षपदी अँड. मंजुषाताई दराडे यांची निवड जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरदचंद्र पवार साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष फौजीया खान प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, बीड जिल्हाध्यक्ष आमदार संदीप भैया क्षीरसागर, माजी आमदार उषाताई दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिला बीड जिल्हाध्यक्ष पदाचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अँड. मंजुषाताई दराडे यांचे अभिनंदन होत आहे. माजी आमदार तथा मा. महिला प्रदेशाध्यक्ष अँड उषाताई दराडे यांच्या यांचा आदर्श समोर ठेवून नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षा अँड मंजुषाताई दराडे यादेखील बीड जिल्ह्यामध्ये महिला संघटन वाढवण्यामध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्यासाठी आपले अनमोल योगदान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल विश्वास वाढवतील असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. आगामी काळामध्ये बीड जिल्ह्यातील महिलांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधायक कार्य हाती घेईल आणि पक्षीय संघटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास नियुक्तीनंतर नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला बीड जिल्हाध्यक्ष अँड मंजुषाताई दराडे यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS