Homeताज्या बातम्यासंपादकीय

ईव्हीएम ची प्रशंसा करित निवडणूका घोषित!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार की राष्ट्रपती राजवट लागणार, अशी शंका सातत्याने व्यक्त केली जात होती; पण, अखेर काल दुपारी केंद्रीय निवडणूक

समझदार सभी जानते है….. बिसलेरी !
अपहरण, खंडणी, स्टॅम्प घोटाळा, भ्रष्टाचार यांचा संयुक्त शब्द म्हणजे मोपलवार !
अनुयायी बाळासाहेबांची तर्कशुद्धता स्विकारतील!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार की राष्ट्रपती राजवट लागणार, अशी शंका सातत्याने व्यक्त केली जात होती; पण, अखेर काल दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन, महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. तत्पूर्वी महाराष्ट्रातील बारा पैकी सात राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड ही झाली आणि शपथविधी झाला. ही प्रक्रिया जशी घाईघाईने झाली, तशी, निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुका अगदी कमी वेळात घेण्याचा प्रकार केल्यामुळे, महाराष्ट्र हे मोठे राज्य असल्याने किमान दोन टप्प्यात मतदान व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबर ला महाराष्ट्रात आणि १३ आणि २० नोव्हेंबरला झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होतील, असं जाहीर केलं. महाराष्ट्रात विशेषतः शहरी मतदारसंघ आणि महानगरांमध्ये मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीवर निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली. त्या-त्या शहरांमधील मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर आम्ही भर देऊ, असेही आयोगाने जाहीर केलं. निवडणुका जाहीर केल्यानंतर, होणाऱ्या पत्रकार परिषदेत पत्रकारांचे प्रश्न हे नेहमीच तिखट स्वरूपात येतात. परंतु, त्यावर निवडणूक आयोग एक प्रकारे मखलाशी करून पुढे जाण्याचा प्रयत्न करते. खासकरून हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुलनात्मक प्रश्न विचारण्यात आले. ईव्हीएम च्या संदर्भात पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आले. आयोगाने नेहमीसारखंच ईव्हीएमला निर्दोष ठरवत आणि ईव्हीएम कसं योग्य आणि निर्धोक माध्यम आहे, हे पुन्हा एकदा पटवण्याचा प्रयत्न केला. खरा प्रश्न हा आहे की, लोकशाही व्यवस्थेतील सर्वात मोठा अधिकार हा जनतेचा असतो आणि ज्या जनतेला ईव्हीएमवर विश्वास नाही, त्याच जनतेच्या समोर पुन्हा पुन्हा ईव्हीएम च्या संदर्भात प्रशंसा करीत राहणं, यामध्ये निवडणुका आयोगाला नेमका काय रस आहे, हा प्रश्न सातत्याने लोकांच्या डोक्यात घोंगावतो. अर्थात, हे सर्व प्रश्न पुन्हा पुन्हा येत राहतात. परंतु, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या पुन्हा एकदा पाच वर्षानंतर लागल्या आहेत. त्यामुळे सगळेच पक्ष आता कामाला लागले आहेत. २२ ऑक्टोबरला अधिकृतपणे निवडणुकीची अधिसूचना जारी होईल आणि दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे २३ ऑक्टोबर पासून उमेदवारांच्या अर्ज भरण्याला सुरुवात होईल. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असून ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होईल. मात्र, अर्जाची छाननी ते अर्ज माघारी यामध्ये चार दिवसाचा गॅप ठेवण्यात आलेला आहे. अर्जाची छाननी ते माघारी या दरम्यान  जेवढा जास्त काळ देण्यात येतो, तेवढं उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी सक्ती दडपण किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रकार होतो; हा अनेक ठिकाणच्या निवडणुकांचा अनुभव आहे. तरीही, अर्ज छाननी ते माघारी यादरम्यान चार दिवसांचा जो गॅप आहे, त्याचे कारण आहे की, यादरम्यान दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे माघारी जी अवघ्या दोन दिवसानंतर असते ती चार दिवसानंतर करण्यात आलेली आहे. माघारी नंतर प्रत्यक्षात जे उमेदवार मैदानात राहतील, त्यांचा प्रचार सुरू होईल आणि हा प्रचार १८ नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता संपेल. १९ तारखेला मतदान अधिकारी आपापल्या मतदान केंद्रावर जातील आणि २० तारखेला सकाळपासून मतदानाला सुरुवात होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन नवीन विधानसभा ही २४ २५ २६ या तीन तारखेंपैकी एका दिवशी गठित होण्याची शक्यता आहे. अर्थात, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्यामुळे २४ ते २६ अवघ्या तीन दिवसात नव्या विधानसभेचे गठन करणे बंधनकारक राहील.

COMMENTS