कोपरगाव प्रतिनिधी ः जलजीवन मिशन अंतर्गत प्रगतीपथावर असणार्या पाणीपुरवठा योजनांची कामे गुणात्मकदृष्ट्या दर्जेदार करून लोकांना लवकरात लवकर घरोघरी
कोपरगाव प्रतिनिधी ः जलजीवन मिशन अंतर्गत प्रगतीपथावर असणार्या पाणीपुरवठा योजनांची कामे गुणात्मकदृष्ट्या दर्जेदार करून लोकांना लवकरात लवकर घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणे यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या. राज्य तसेच केंद्र पुरस्कृत घरकुल योजनांची विविध टप्प्यांवर प्रलंबित असणारी घरकुले तातडीने सुरू करून तीन महिन्यांच्या आत भौतिक व आर्थिकदृष्ट्या पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी येरेकर यांनी दिल्या. यावेळी पंधराव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीचा गावनिहाय आढावा घेण्यात आला.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना आणि पंधरावा वित्त आयोग तसेच माझी वसुंधरा अभियान, स्वच्छता ही सेवा, सेवा महिना, मेरी मिट्टी मेरा देश या केंद्र तसेच राज्य पुरस्कृत विविध महत्त्वाकांक्षी योजना आणि अभियानांची नुकतीच अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कोपरगाव पंचायत समितीच्या कार्यालयात सर्व विभाग प्रमुख आणि क्षेत्रीय कर्मचारी यांची मॅरेथॉन बैठक घेत सखोल आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते.
या बैठकीसाठी प्रकल्प संचालक सुनील कुमार पठारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राहुल शेळके, समर्थ शेवाळे, उपअभियंता किरण साळवे, पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे, उपअभियंता चांगदेव लाटे, संतोष दळवी, पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाघेरे, कृषी अधिकारी सचिन कोष्टी, प्रशासन अधिकारी गोडे, संतोष नलगे, राजेश डोंगरे, विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, प्रशांत तोरवणे यांचेसह तालुकास्तरा वरील सर्व पर्यवेक्षकीय व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण भागात प्लास्टिक कचर्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्या अधिक असणार्या ग्रामपंचायतींनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे देखील प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण यापूर्वी जिल्हा परिषद यंत्रणेद्वारे पूर्ण करण्यात आले आहे. अशाप्रकारे एकल महिलांचे सर्वेक्षण करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला असून यापुढील काळात ग्रामीण भागातील एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे सोयीस्कर ठरणार आहे. माझी वसुंधरा अभियान, स्वच्छता ही सेवा, सेवा महिना, मेरी मिट्टी मेरा देश यासारखे उपक्रम राबविताना त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढवा यासाठी स्थानिक पदाधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांनी समन्वयाने काम करण्याचा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी यावेळी सांगितले.
कोपरगाव पंचायत समितीचे कौतुक – पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीचा विनियोग, जल जीवन मिशन अंतर्गत घरगुती नळ जोडणीचे प्रमाण घरकुल पूर्णत्वाची आकडेवारी तसेच घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे यामधील समाधानकारक कामकाजाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कोपरगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांचेसह संबंधित अधिकार्यांच्या कामाची प्रशंसा केली.
COMMENTS