Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वोदय विद्यामंदिरला तीन लाखांचे शैक्षणिक साहित्य

अकोले : तालुक्यातील अंबितखिंड येथील सर्वोदय विद्यामंदिर या विद्यालयास वॅन्हुआ इंटरनॅशनल (इंडिया) प्रा. लि. कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून सु

भांबोरा येथील सौर प्रकल्पाविरोधात आंदोलन; प्रांताधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित
विचारांचा दुष्काळ दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीची रचना : हभप म्हस्के
शिवी दिल्यास ५०० रुपयांचा दंड; कोळगावात महिला ग्रामसभेचा निर्णय

अकोले : तालुक्यातील अंबितखिंड येथील सर्वोदय विद्यामंदिर या विद्यालयास वॅन्हुआ इंटरनॅशनल (इंडिया) प्रा. लि. कंपनीच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.

 या कार्यक्रमात शाळेला अत्याधुनिक स्मार्ट इंटरअॅक्टिव्ह बोर्ड, आर.ओ. वॉटर फिल्टर, लॅपटॉप तसेच क्रीडा साहित्य अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय घनकुटे होते. वॅन्हुआ कंपनीचे समन्वयक सचिन शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यात ही शाळा संपूर्णपणे डिजिटल करण्यासाठी कंपनीच्या वतीने सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले. साळवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक आर. के. गीते यांनी केले.

 या प्रसंगी अंबितखिंड गावच्या सरपंच यमुनाताई घनकुटे, बाळासाहेब गोडे, कडू, साळवे, कचरे, गोडे, दत्तात्रय फुलसुंदर, दत्ता मुठे, नवले, सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वॅन्हुआ कंपनीच्या या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शाळेच्या वतीने कंपनीचे आभार मानण्यात आले.

COMMENTS