इस्लामपूर / प्रतिनिधी : समग्र ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या आवडी निवडीनुसार विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला पाहिजे. त्यांना शहाणपणाचे आणि सर्वांग
इस्लामपूर / प्रतिनिधी : समग्र ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या आवडी निवडीनुसार विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला पाहिजे. त्यांना शहाणपणाचे आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देणे गरजेचे आहे. हे नव्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. असे विचार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी मांडले.
येथील वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित स्व. खा. एस.डी. पाटील यांच्या जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे मानद सचिव ड. बी. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सहसचिव ड.धैर्यशील पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेमार्फत सुरू झालेल्या नव्या अभ्यासक्रमांची माहिती देतानाच कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या शिवाजी विद्यापीठाच्या विविध अंगी विकासाबद्दल त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शहा, माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ. शिर्के म्हणाले, समाजात ताठ मानेने जगण्यासाठी आर्थिक मूल्ये नव्हे तर ज्ञानादिष्टीत व्यवस्था विकसित व्हावी. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याचा शिक्षण व्यवस्थेमधील प्रवेश आणि शिक्षण घेऊन बाहेर पडतानाचा त्याची पुढील जीवनासाठी आनंददायी वाटचाल मोलाची हवी. शिक्षकांशी असलेले नाते आणि दृढ विश्वास, तितकीच शिक्षकाची तत्परता आणि विद्यार्थ्यांशी बनलेले घनिष्ठ नाते; अशा प्रवाहातून शिक्षण व्यवस्था प्रगल्भाकडे जाऊ शकते.खर्या अर्थाने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास देण्याचे एक महत्त्वाचे आयुध आहे. चांगले ज्ञानाधिष्ठित व ध्येयाने प्रेरित झालेले विद्यार्थी घडविण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे, गुणवत्तेचे शिक्षण देणारी व्यवस्था आणि तसे पारंगत तळमळीने शिकविणारे शिक्षक असतील तर विद्यार्थी याचा लाभ जरूर घेतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
COMMENTS