चंदीगड : सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) आज, मंगळवारी पंजाबमध्ये धाडी टाकल्यात. वाळू तस्कर भूपिंदर सिंग हनी याच्या मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली. याद
चंदीगड : सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) आज, मंगळवारी पंजाबमध्ये धाडी टाकल्यात. वाळू तस्कर भूपिंदर सिंग हनी याच्या मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली. यादरम्यान ईडीच्या तडाख्यात सापडलेले लोक मुख्यमंत्री चन्नी यांचे नातेवाईक असल्याने याप्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. ईडीने आज, मंगळवारी पंजाबमध्ये एकूण 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. छापे टाकण्यात आलेल्या व्यक्ती चन्नींचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील ईडीच्या या धाडींमुळे पंजाबचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नातेवाईकांच्या मालमत्तांवर छापा टाकला जात आहे. ते मला टार्गेट करत आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री चन्नी यांनी केला. हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. आम्ही यासाठी लढण्यास तयार आहोत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही असेच घडल्याचा आरोप चन्नी यांनी केलाय.
COMMENTS