नवी दिल्ली प्रतिनिधी - दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणचा तपास आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात, 16 एप्

नवी दिल्ली प्रतिनिधी – दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणचा तपास आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात, 16 एप्रिल रोजी सीबीआयने जवळपास 9 तास चौकशी केल्यानंतर, केजरीवाल गुरुवारी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीसमोर हजर होणार आहेत. ईडीने केजरीवाल यांना आज चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय ते ईडी कार्यालयापर्यंत सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.जेव्हापासून ईडीने केजरीवाल यांना हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे, तेव्हापासून दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप इंडिया आघाडीला घाबरत आहे, म्हणूनच ईडीच्या माध्यमातून भारतातील नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर भाजप सातत्याने कायद्यानुसार चौकशी होत असल्याचे सांगत आहे. आणि केजरीवाल हे या घोटाळ्याचे सूत्रधार आहेत, असल्याचंही भाजपने म्हटलं आहे. परिस्थिती पाहता दिल्ली पोलीस सतर्क आहेत. ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून पोलिसही वाहनांची तपासणी करणार आहेत. नवी दिल्ली परिसरात कोणी आंदोलन केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. याशिवाय ईडीच्या मुख्यालयाभोवती मोठा पोलिस बंदोबस्त असणार आहे
COMMENTS