कोपरगाव प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेचे, गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय, कुंभारी येथे इको फ्रेंडली गणेश मूर्ती शाडू माती पासून तयार करणे कार्यशाळ
कोपरगाव प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेचे, गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालय, कुंभारी येथे इको फ्रेंडली गणेश मूर्ती शाडू माती पासून तयार करणे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी चव्हाण जी. एस. स्थानिक चित्रकार यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती साकारण्यासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी 102 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व बाप्पा बनवण्यासाठी मनमुराद आनंद लुटला. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक बागुल डी.एन. यांच्या पूर्व परवानगीने कार्यशाळेचा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केल्यामुळे चव्हाण जी. एस. यांचा सत्कार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिवे ए. वाय. यांनी केला. तसेच लहान गट इयत्ता पाचवी ते सातवी व मोठा गट आठवी ते दहावी प्रथम तीन क्रमांकाने निवड करण्यात आली. लहान गटातून प्रथम कुमारी अंकिता साईनाथ इयत्ता सातवी ब, द्वितीय क्रमांक पवार प्रतीक्षा दिलीप सातवी ब, तृतीय क्रमांक मोहरे सार्थक नवनाथ सहावी ब, मोठ्या गटातून प्रथम क्रमांक कदम यश संजय इयत्ता नववी ब, द्वितीय क्रमांक कुमारी कदम वैष्णवी उत्तम इयत्ता नववी ब, तृतीय क्रमांक चंदनशिव अस्मिता लक्ष्मण इयत्ता दहावी, सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. शेवटी तज्ञ मार्गदर्शक चव्हाण जी. एस.यांनी बक्षीस पात्र विद्यार्थी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आभार प्रदर्शन बाविस्कर आर.एस.यांनी केले.
COMMENTS