नवी दिल्ली ः देशामध्ये बदल होतांना दिसून येत असून, आगामी काही महिन्यांमध्ये प्रादेशिक पक्ष काँगे्रससोबत असतील अन्ययथा काँगे्रसमध्ये विलीन होतील अ

नवी दिल्ली ः देशामध्ये बदल होतांना दिसून येत असून, आगामी काही महिन्यांमध्ये प्रादेशिक पक्ष काँगे्रससोबत असतील अन्ययथा काँगे्रसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य खासदार शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँगे्रसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या अशी खुली ऑफरच खासदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिली आहे. पंतप्रधान मोदींच्या या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी नंदुरबारमध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत शरद पवार यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. लोकसभा निवडणुकीनंतर छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे शरद पवार म्हणत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे आमच्याबरोबर यावे. त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होतील, असा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी दिला होता. यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोणत्याही प्रकारचा स्वाभिमान बाजूला ठेऊन राष्ट्रहिताचा बळी देऊन नरेंद्र मोदी यांच्यासारख्या बाजूला जातील. कुणी याचा विचार स्वप्नातही करणार नाही. मोदींना समोर त्यांचा पराभव दिसतोय, असं संजय राऊत म्हणाले. गेल्या 10 वर्षात देशाच्या स्वप्नाची वाट नरेंद्र मोदी यांच्या राज्यकारभाराने लावली आहे. आमचे स्वप्न आहे की, मोदींना सत्तेवरून खाली खेचायचे. या देशातील हुकूमशाहीचा पराभव करायचा. या देशातील सविधान वाचवायचे, असे राऊत यांनी म्हटले आहे. आमच्या स्वप्नाला हातभार लावून पंतप्रधान मोदी सत्तेवरून पायउतार होत असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असा टोलाही राऊत यांनी मोदींना लगावला.
एनडीएमध्ये कदापी जाणार नाही ः शरद पवार – पंतप्रधान मोदी यांच्या खुली ऑफरवर बोलतांना शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे कुठे म्हणाले? पत्रकारांनी नंदुरबारचा उल्लेख करताच शरद पवार म्हणाले की, आजकाल ते महाराष्ट्रात वारंवार येत आहेत. शरद पवार पुढे म्हणाले, आज देशामध्ये संसदीय आणि लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली गेली. केंद्र सरकारचा यात सहभाग असल्याशिवाय एवढी मोठी कारवाई होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वासच नाही. हा समज आता लोकांमध्येही पक्का झाला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही.
COMMENTS