Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवार मुख्ममंत्री असतांना घेतली होती दाऊदची भेट : अ‍ॅड. आंबेडकर

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली असतांना वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी खळबळजनक

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा
IAS अधिकारी टीना डाबी झाल्या आई, जयपूर येथील रुग्णालयात मुलाला दिला जन्म
नसरीन इनामदार यांना नेशन्स बिल्डर अवार्ड’ प्रदान

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली असतांना वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी खळबळजनक दावा केला. खा. शरद पवार मुख्यमंत्री असतांना ते कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमला भेटले होते, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे मुंबईतील गँगवॉरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच आंबेडकर यांनी शरद पवारांवर थेट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा आरोप केला आहे.आंबेडकर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत म्हणाले, शरद पवार 1988 ते 1991 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात ते एका परदेश दौर्‍यावर गेले होते. ते भारतातून लंडनला गेले. तेथून कॅलिफोर्नियाला त्यांनी 2 दिवस मुक्काम केला. तिथे त्यांनी एक बैठकही घेतली. ही बैठक कुणासोबत झाली? हे स्पष्ट झाले पाहिजे. कॅलिफोर्नियातून शरद पवार लंडनला व तेथून दुबईला आले. त्यांनी दुबई विमानतळावरच कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भेट घेतली. यावेळी दाऊदने पवारांना सोन्याचा हार भेट दिला. त्यानंतर सायंकाळच्या विमानाने पवार लंडनला गेले आणि तेथून 2 दिवसांनी पुन्हा मायदेशी परतले. देशातील कोणताही मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय परदेश दौरा करू शकत नाही. त्यामुळे तत्कालीन केंद्र सरकारने शरद पवारांच्या दौर्‍याला मान्यता दिली होती का? कॅलिफोर्नियातील बैठक व दाऊदची भेट या दोन्ही घटनांना केंद्राची परवानगी होती का? दिली होती तर त्या भेटीचा अहवाल त्यांनी केंद्राला सुपूर्द केला होता का? याचा खुलासा विद्यमान केंद्र सरकारने केला पाहिजे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या मालिकेमुळे याचा खुलासा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS