Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत दुसर्‍यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली ः नेपाळमध्ये सातत्याने भूकंप सुरू असून, राजधानी आणि एनसीआरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सोमवारी दुपारी 4 वाजून 18 मिनिटांनी

तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप
हिंगोली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले
जपानमध्ये पुन्हा 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप

नवी दिल्ली ः नेपाळमध्ये सातत्याने भूकंप सुरू असून, राजधानी आणि एनसीआरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सोमवारी दुपारी 4 वाजून 18 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे खळबळ उडाली होती. धक्के जाणवल्यानंतर नागरिक घराबाहेर पडल्याचे दिसून आले. या भूकंपाचे केंद्रस्थान नेपाळ असून या भूकंपाची तीव्रता 5.6 रिक्टर स्केल असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नोंदवण्यात आले आहे.

या भूकंपामुळे आतापर्यंत कोणीही मृत किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान दोन दिवसांपूर्वी देशाच्या राजधानीत भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. मागील आठवड्यातदेखील नेपाळमध्ये भूकंप झाला होता. यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान भूकंप येणार असल्याविषयी अचूक अंदाज लावता येत नाही तसेच किंवा कधी येऊ शकतो हे सांगता येत नाही. यामुळे भूकंप आला तर सुरक्षितस्थळी जावे. तसेच संरक्षण उपाय केले पाहिजेत.

COMMENTS