Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील एसटी बससेवा सुरळीत

एसटी संपाची हाक ठरली फोल

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने सोमवारपासून एसटी संपाची हाक दिली होती. म

‘दि चँपियन ऑफ दि चेंज’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव पवार यांचा सत्कार
अपघातात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू
महानगरपालिकेवर काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने सोमवारपासून एसटी संपाची हाक दिली होती. मात्र हा दावा फोल ठरतांना दिसून येत आहे. कारण सोमवारी राज्यातील एसटी बससेवा 100 टक्के सुरळीत सुरू असल्यामुळे सदावर्तेंच्या आवाहनाला एसटी कर्मचार्‍यांनी प्रतिसाद न दिल्याचे दिसून आले.
राज्यातील मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, वर्धासह अनेक विभागातसकाळच्या सत्रात 100 टक्के वाहतूक सुरू होती. कोल्हापुरातही सकाळच्या सत्रातील एसटी सुरु आहेत. माजलगाव आगारातही एसटी बसेस सुरु आहेत. त्यासोबतच ठाणे, पाटोदा, दिग्रस, हिंगोली, आणि कळंब आगारातील एसटी बससेवा 100 टक्के सुरु आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचार्‍यांच्या या उत्स्फूर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचार्‍यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेंच्या आवाहानाला प्रतिसाद नाही. वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे,  पाटोदा आगार, दिग्रस आगार, यवतमाळ विभाग, हिंगोली आगार, कळंब आगारात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे.  गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला. सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेने 6 नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील 250 आगारातील सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व बस फेर्‍या एसटी आगारातून व्यवस्थित मार्गस्थ झाल्या आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून वाहतूक तूर्तास तरी सुरळीत सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस.टी. बस हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपर्‍यामध्ये वाहतुकीची सेवा देते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या संकटांमुळे एसटी ही तोट्यात होती.त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते. त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल 9000 कोटी रुपयांचा आतापर्यंत संचित तोटा झाल्याची बाब समोर आली होती. सरकार आणि एसटी महामंडळ यांनी घेतलेल्या काही निर्णयामुळे हळूहळू एसटीची आर्थिक क्षमता रुळावर येत असल्याची परिस्थिती आहे. आज घडीला एसटी महामंडळ 1990 ते आतापर्यंत एकूण 9 हजार कोटी रुपयांच्या संचित तोट्यात आहे. मात्र आता मासिक आणि दैनंदिन तोट्याच प्रमाण कमी झाले आहे. असे असतांना, पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली होती.

एसटीची दिवाळी जादा वाहतूक सुरु – राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरु असल्याने शालेय फेर्‍यांना एसटीकडून प्राधान्य देण्यात आले आहे. येत्या 9 नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळी जादा वाहतूक सुरु होणार आहे.

COMMENTS