Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्री झिरवाळ यांच्या पाठिशी

मुंबई ः राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्‍वभूमी

राष्ट्रवादीचे विलीनीकरण शक्य नाहीच; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून चर्चेला पूर्णविराम
सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर संधी
राज्यातील 57 सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार

मुंबई ः राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी झिरवाळ यांच्या पाठिशी उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पक्षाच्या मुख्य समितीची बैठक सोमवारी सायंकाळी बोलावण्यात आली आहे. मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर टीका सुरू केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, झिरवाळ यांनी या प्रकरणाशी आपला कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करत, चौकशीत दोष आढळल्यास आपण पदाचा त्याग करू, असे जाहीर केले आहे. मात्र घटनेनंतर काही काळ ते सार्वजनिकरीत्या संपर्कात नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पक्षाच्या मुख्य समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत झिरवाळ प्रकरणातील घडामोडींचा आढावा घेतला जाणार असून पुढील राजकीय भूमिका काय असावी, यावर सदस्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. तसेच पक्षाच्या संघटनात्मक बाबींवरही चर्चा अपेक्षित आहे.

COMMENTS