Homeताज्या बातम्याकृषी

कापसाला भाव नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत घरातच पडून आहे कापूस

नागपूर प्रतिनिधी - चोपडा तालुका सह जिल्हाभरामध्ये बऱ्याच पैकी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करीत असतात वेळी अवेळी पाऊस आणि अळीचा प्राद

कराडला विजय दिवसानिमीत्त विजय स्तंभास अभिवादन
Dindori : अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा तोडण्याची नामुष्की (Video)
राजारामबापू कारखान्याच्या कर्मचार्‍यांना 12 टक्के पगारवाढ : पी आर पाटील

नागपूर प्रतिनिधी – चोपडा तालुका सह जिल्हाभरामध्ये बऱ्याच पैकी शेतकरी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड करीत असतात वेळी अवेळी पाऊस आणि अळीचा प्रादुर्भाव अशा संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतले परंतु त्या कापसाला मुहूर्ताचा भाव व्यापाऱ्यांनी 14000 आणि 15000 नी काढला व त्यानंतर कापसाचा भाव झपाट्याने खाल्ली उतरवत आठ हजार पर्यंत कापूस आता शेतकऱ्यांकडून मागितला जात आहे. आता लागलेला खर्च फवारणीच्या खर्च असा बराच खर्च शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला लागलेला आहे. आणि आठ हजार रुपये भावाने मागत असल्याने तो परवडत नाही या भावामुळे लागलेला खर्च तो देखील निघत नाहीये तर कुठून द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस भरून ठेवलेला आहे गेल्या चार महिने पासून भाव वाढेल या अपेक्षेने घरातच कापूस पडून आहे त्याची घट देखील होत आहे. जर कापूस काढणे सुरू होती त्याचवेळी जर भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांनी तात्काळ कापूस विकला असता घरात भरून ठेवण्याची वेळ आली नसती आणि त्याची गट देखील झालेली नसते परंतु भाव नसल्याने शेतकऱ्यांना कापूस घरात ठेवावे लागत आहे. शासनाने कापसाला हमीभाव दिला तर व्यापारी देखील हमीभावानेच खरेदी करेल त्यामुळे भाव कमी जास्त होण्याची वेळच येणार नाही अशी अपेक्षा  कापूस उत्पादक शेतकरी यांनी व्यक्त केलेले आहे. 

COMMENTS