अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई शहरातील वीज सतत बंद होत असल्याने व्यापारी वर्गाला महावितरण कंपनीचा सतत त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या अजब
अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई शहरातील वीज सतत बंद होत असल्याने व्यापारी वर्गाला महावितरण कंपनीचा सतत त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या अजब कारभारामुळे सतत वीज बंद राहिल्याने दुकानातील माल खराब होत आहे. सर्व सामान्याच्या व्यवसायावर पाणी पडत आहे.
तसेच महावितरण कंपनीच्या कार्यालयास फोन केल्यानंतर देखील फोन उचलण्यास कर्मचारी हजर नसतो. कदाचित जर फोन उचला असला तरी कर्मचारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करतात तसेच अधिकारी यांना देखील फोन केला असता ते देखील उडवा उडवीचे उत्तरे देत असतात. अधिकार्यांचा महावितरण कर्मचार्यांवर वचक राहत नसल्याचे दिसून येत असल्याने यांचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. जर बील भरून सुध्दा नागरिकांना न्याय मिळत नसेल तर नागरिकांनी जायचे कोणाकडे ? हा यक्ष प्रश्न आहे सध्या कडक उन्हाळा असून अंगाची लाही लाही होत असताना कसलीही सूचना न देता अचानकच तासनतास वीज गायब झाल्यावर नागरिकांनी जगायचे कसे ही विचार करणारी गोष्ट आहे महावितरणच्या कर्म चार्यांना फोन उचलायला वेळ नाही
वर्गातुन होत असल्याने अधिकार्यांनी लक्ष देवून सतत वीज बंदची अडचण दूर करावी अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.
COMMENTS