Homeताज्या बातम्यादेश

नशेत व्यक्तीने स्वतःच्याच गळ्यात गुंडाळला जिवंत अजगर

नशेत लोक अनेकदा असं काहीतरी करतात, ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो. नशेच्या अवस्थेत मानवी मेंदू योग्यरित्या कार्य करू शकत नाही. आपण जे करतोय

केंद्राने साखर निर्यात अनुदान न दिल्यास साखर उद्योगासमोर आर्थिक संकट : पी. आर. पाटील
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांबरोबर
पंढरपूरला जाताना कारच्या धडकेत कोल्हापूर जिल्ह्यातील 7 वारकर्‍यांचा मृत्यू

नशेत लोक अनेकदा असं काहीतरी करतात, ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो. नशेच्या अवस्थेत मानवी मेंदू योग्यरित्या कार्य करू शकत नाही. आपण जे करतोय ते योग्य की अयोग्य हेच त्यांना कळत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मद्यधुंद व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ इतका भयावह आहे की तो पाहिल्यानंतर तुमचाही थरकाप उडेल. या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीने इतकी दारू प्यायली होती की, त्याला समजलंच नाही की त्याने स्वतःच्याच गळ्यात मृत्यू गुंडाळला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो माणूस आपल्या गळ्यात अजगर गुंडाळून थेट पेट्रोल पंपावर गेला आणि तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना अजगरासोबत त्याचा फोटो काढण्यास सांगितलं. ही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत पेट्रोल पंपावर पोहोचली होती. त्याला कशाचीच जाणीव नव्हती. त्याने एवढी दारू प्यायली होती, की त्याला नीट चालताही येत नव्हतं. अजगराचं वजन खूप जास्त होतं, त्यामुळे तो व्यक्ती जमिनीवर पडला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तो व्यक्ती पडल्यानंतर उठलाही नाही आणि जमिनीलाच आपला पलंग समजू लागला. पेट्रोल पंपावर उपस्थित असलेले कर्मचारी हे सगळं पाहात होते. तो माणूस अजगराला घेऊन जमिनीवर पडल्यावर कर्मचारी त्याच्याजवळ आले आणि पोत्याच्या साहाय्याने त्याच्या गळ्यातील अजगर बाजूला काढला. अजगरानेही सहज त्या व्यक्तीची मान सोडली आणि तिथून पळ काढला.

COMMENTS