द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ

Homeताज्या बातम्यासंपादकीय

द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या सुरु असलेले वाद विकोपाला जात आहेत. अशा या वादातूनच किरीट सोमय्यांना मुंबई महानगर पालिकेच्या दारात शिवसैनिकांनी बदडून क

लोकसभा सचिवालयाला साक्षात्कार  
हिजाब आणि जानवं
मंदीचे सावट गडद

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या सुरु असलेले वाद विकोपाला जात आहेत. अशा या वादातूनच किरीट सोमय्यांना मुंबई महानगर पालिकेच्या दारात शिवसैनिकांनी बदडून काढले होते. वाद म्हणजे नुसत्या मारामाऱ्या किंवा हमरीतुमरी नव्हे. वाद हे वैचारिक, तात्विक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, आत्मिक, भौतिक, बौद्धिक अशा विविध पैलूंचे असतात. साधारणपणे आपल्याकडे बुद्धिहीन माणसे गैरसमजातून जास्त वाद घालणारे सापडतात. हे असले बहाद्दर ना वाचन करतात, ना चिंतन करतात. स्वतःला ग्रेट समजणारे हे असले गबाळग्रंथी आपल्या देशात भरपूर. त्यात कमी पडली की काय म्हणून अजून एक त्यात भर पडली. ती म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची. भगतसिंह कोश्यारी महोदयाने शिवाजी महाराजांबद्दल नवीन संशोधन करून महाराष्ट्रात पुन्हा एक नवा वाद घातलाय. तो वाद आहे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या इतिहासातला.
आपल्याकडे इतिहासकारांनी सरासरी इतिहास हा खोटा रेखाटला आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. हा खोटा इतिहास लिहिणारी मंडळी कोण आहे हेही सांगण्याची गरज नाही. ते सर्वसृत. बरं ही चतुर मंडळी नुसता खोटा इतिहास सांगून गप्प बसत नाहीत. ते भविष्य सुद्धा सांगतात. तेही खोटेच सांगतात. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलले, पण त्यांना हे  कुणी लिहून दिले किंवा सांगितले असेल तर? तसे झाले असेल तर संघाच्या व्यक्ती शिवाय हे दुसरं कुणी करू शकतं का? कदाचित करूही शकत. आपल्याला त्यांच्या सारखा वाद अजिबात घालायचा नाही. पण हे एकतर असतात जेम्सलेन किंवा त्याला माहिती पुरवणाऱ्या कुळातले. आता असल्याचा किरीट सोमय्या करणारे आपल्याकडे अनेक आहेत. पण, हे त्याच्यावरील उत्तर नव्हे. त्यासाठी वाचन, चिंतन लेखन करणे गरजेचे. ते लेखन, वाचन, चिंतन मग इतिहासाचे असो वा इतर कोणतेही. ते करतांना त्याला सैद्धांतिक दृष्टया तर्काचा आईना लावणे गरजेचे असते. असे करणारे आपल्या देशात किती लेखक सापडतील? जे काही आहेत ते मनुस्मृतींच्या समर्थकांच्या संस्कृतीत वाढलेले असतात. आता अशा विषयाचे जेव्हा सिद्धांतन करायचे असते तेव्हा त्यांना मर्यादा येते. कोणत्याही वस्तूचे आकलन करून घेण्यासाठी त्याला सिद्धांताची गरज असते असे स्टीफन हॉकिंग म्हणतात. हे सिद्धांत पुन्हा पुन्हा बादलीत ज्ञानाचा विकास होत असतो.
आता आपण जगत आहोत ते युग आहे आधुनिक. पण आपण जी चर्चा करतो ती असते मध्ययुगाची, आदिम युगाची, प्राचीन युगाची. मग आजचा आपला समाज नेमक्या कुठल्या युगात जगतोय? आपला समाज हा अनेक युगात जगात आहे. आता अनेक युगाचा इतिहास आपण चाळल्यास समाज हा कधी स्त्री सत्ताक, कधी मातृसत्ताक, कधी पितृसत्ताक व्यवस्थेत आणि अवस्थेत राहिलेला आहे हे आपल्या लक्षात येते. भारतात महात्मा फुले यांनी पितृसत्ताकाची मांडणी केलेली आहे. हे यासाठी सांगायचे आहे की, समाज नेमक्या कोणत्या युगात जगतो हेच मुळात त्याला माहित नसते. मग आपल्याकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जसे बरळले तसे अनेकजण अनेक विषयावर बरळतात. भगतसिंह कोश्यारी असे बरळले की, “महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे.” “आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
‘शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे’ हे वाक्य भगतसिंह कोश्यारी यांनी कशाचं संशोधन करून म्हटलं आहे? त्याचा पुरावा काय आहे.? इतिहासातली एकलव्य आणि द्रोणाचार्याची गोष्ट सर्वाना माहित आहे. त्याप्रमाणे हे असले द्रोणाचार्यांच्या वंशावळीतले हे लोक वागतात आणि समोरच्याची विद्या ( बुद्धी ) गुल करत असतात. इतिहासाचे प्रभंजन त्यासाठीच हे करत असतात. द्रोणाचार्याची वैचारिक वंशावळ जोपासणारे हे खरे मनुस्मृतीचे समर्थक असतात. पण मनू नावाचा माणूसच अस्तित्वात नव्हता हे घटनाकारांनी सिद्ध केले आहे. हे यांना माहीतच नाही. भगतसिंह कोश्यारी यांचा सर्वत्र निषेद होत आहे. ते योग्यच. पण या निमित्ताने सर्वांनी इतिहासाचा मानवतावादी दृष्टीकोनातून अभ्यास करावा हि अपेक्षा.

COMMENTS