द्रौपदी मुर्मू देशाच्या कणखर राष्ट्रपती ठरतील !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

द्रौपदी मुर्मू देशाच्या कणखर राष्ट्रपती ठरतील !

  भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ विधी संपन्न होताच, त्यांनी केलेले छोटेसे भाषण, त्यांच्या

 अनेक मुद्द्यांवर शिष्टमंडळ घेऊन भेटलो आणि चर्चा झाली – राज ठाकरे
टॉवेल खरेदी करणे पडले सहा लाख रुपयाला
व्याधिमुक्त रुग्णांसाठी स्नेहदीपतर्फे परिचर्या

  भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ विधी संपन्न होताच, त्यांनी केलेले छोटेसे भाषण, त्यांच्या पुढील कार्याची झलक स्पष्ट करते. द्रौपदी मुर्मू यांचे मूळ नाव त्यांनी आपल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले. त्यामध्ये पुती तुडू असे त्यांचे नाव सांगण्यात आले. आपल्या शिक्षकाने पुती हे नाव बदलून द्रौपदी केल्याचे सांगत विवाहानंतर तुडू हे आडनाव मुर्मू असे करण्यात आल्याचेही त्यांनी संक्षिप्त मुलाखतीतून स्पष्ट केले. आपल्या मुलाखतीपेक्षाही शपथविधीनंतर त्यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी आपल्या संथाल  जमातीचा लढाऊ इतिहास विशद करण्याचा प्रयत्न केला. आदिवासींच्या जमिनी हिसकावणाऱ्या जमीनदार, सावकार आणि वसाहतवादाविरोधातील  संथालांनी दिलेला लढा हा भारतातला एक महत्त्वपूर्ण लढा असून, इंग्रजांच्या विरोधातला देखील तो पहिला लढा आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले. यावेळी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांचे स्मरण करत त्यांनी संथाल आदिवासी समुदायातील महिला आणि पुरुष सारखेच लढाऊ आणि क्रांतिकारी असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्टपणे म्हटले. आदिवासींच्या प्रदेशांमध्ये सावकार आणि जमीनदारांच्या माध्यमातून इंग्रजांनी जो अतिरिक्त कर या आदिवासी समूहावर लागू केला होता, त्याविरोधात संथालांनी आपला लढा देऊन आपल्या जमिनी आणि कर हे दोन्ही वाचवले.  वसाहतवादाच्या विरोधातील इतिहासातील हा एक क्रांतिकारक लढा म्हणून आपल्या लढ्याचे स्थान निश्चित केल्याचेही, त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. आदिवासी समाज असो किंवा त्या समाजातील व्यक्ती असो त्यांचा जमिनीशी नेहमीच घट्ट संबंध राहिलेला आहे. वनजमिनी कसून त्याचे शेतीत रूपांतर करणारा आदिवासी समाज आपल्या जमिनीपासून तसुभरही हलत नाही. तसा प्रयत्न करणाऱ्यांना इतिहासामध्ये त्यांनी चितपट केल्याचा देशभरातल्या आदिवासींचा इतिहास आहे. वर्तमान राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल असतानाही आदिवासींच्या जमिनी एका वाक्यात वाचवण्याचा लढा त्यांनी दिल्याचे आपण सर्वजण जाणतो. झारखंडमधील आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांना देऊन त्या जमिनीचा विकास घडवून आदिवासींचाही विकास घडून येईल, अशा प्रकारचे एक विधेयक त्यांच्यासमोर प्रशासकीय पातळीवर पाठवण्यात आले; तेव्हा, त्यांनी आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांना देऊन आदिवासींचा विकास कसा होईल, हे एकदा स्पष्ट करून पाठवावे; म्हणजे त्यावर आपल्याला निर्णय घेता येईल, अशा वाक्यात त्यांनी आपल्या प्रशासनाला स्पष्टपणे बजावले होते. आदिवासींच्या जमिनी उद्योजक भांडवलदारांना देऊन त्या जमिनींचाही विकास आणि आदिवासींचा विकास घडवून आणण्याचे प्रलोभन देत झारखंडमध्ये कायदा बनवण्याची प्रक्रिया जेव्हा सुरू झाली, तेव्हा, त्या प्रक्रियेला हाणून पाडण्याचे कामही द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपाल म्हणून केले होते. अशा प्रकारचा कायदा झारखंडमध्ये बनत असतानाच त्या विरोधात संथाल आदिवासींचा लढा उभा राहिला होता. झारखंडमध्ये आदिवासींचे आंदोलन मोठ्या प्रमाणात उभे राहू लागतात स्वतः द्रौपदी मुर्मू यांनी त्या संदर्भात सर्व आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांना या संदर्भात आश्वस्त केले, की, कोणत्याही प्रकारे तुमच्या जमिनी तुमच्या पासून हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही देणार नाही!  विश्वासात घेऊन जेव्हा सांगितले, तेव्हा आदिवासींचा लढा त्या ठिकाणी शांत झाला. तरीही काही प्रमाणात आदिवासी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते त्या केसेस देखील नंतर हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले असताना द्रौपदी मुर्मू आणि हेमंत सोरेन यांनी मिळून आदिवासींवरील ते खटले देखील त्यांनी काढून टाकले. द्रौपदी मुर्मू यांचे भाषण ऐकल्यावर असे वाटते की, त्या डॉ. के. आर. नारायणन् यांच्या परंपरेतील क्रियाशील किंवा कार्यकारी राष्ट्रपती म्हणून आपली छाप सोडतील. संथाल आदिवासी समुदाय हा देशातील आदिवासी समाजातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा समुदाय असून हा समुदाय कायम लढाऊ राहिला, याचे स्मरण आज नव्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात करून दिले. त्या देशाच्या कणखर राष्ट्रपती असतील यात शंकाच नाही!

COMMENTS