Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. तनपुरे कारखान्याच्या मालमत्तेची किंमत ठरणार ?

तीन व्हॅल्यूअरची जिल्हा बँकेकडून नियुक्ती कारखाना गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उपोषण सुरूच

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः कर्जाच्या थकबाकीमुळे ताब्यात घेतलेल्या राहुरी तालुक्यातील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात आता जिल्हा सह

डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाची ज्ञानेश्‍वरी लोहकणे तालुक्यात प्रथम
कोरोनाच्या संकटाचा विकासावर परिणाम होवू दिला नाही – आ. आशुतोष काळे
शेवगाव दंगलप्रकरणी सूड भावनेतून गुन्हे दाखल

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः कर्जाच्या थकबाकीमुळे ताब्यात घेतलेल्या राहुरी तालुक्यातील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात आता जिल्हा सहकारी बँकेने कर्जवसुलीसाठी तयारी सुरू केली आहे. साखर कारखान्याच्या मालमत्तेचे व्हॅल्यूएशन काढण्यासाठी बँकेने तीन व्हॅल्यूअरची नेमणूक केली असून त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर बँक आता पुढे काय निर्णय घेते याचीच चर्चा आता सहकार क्षेत्रासह राहुरीतील शेतकर्‍यांमध्ये सुरू झाली आहे. दुसरीकडे माञ कारखाना बचाव कृती समितीने डॉ. तनपुरे साखर कारखान्यात मागील (विखेंच्या काळात) सहा वर्षात कोट्यावधींचा गैरव्यवहाराची चौकशीसाठी  राहुरी तहसिल कार्यालया समोर चक्री उपोषण सुरू केले आहे.             

नगर जिल्ह्यामध्ये 16 सहकारी तर चार खाजगी सहकारी साखर कारखाने आहेत. चालू वर्षी ऊस मुबलक प्रमाणात असल्याने गळीत हंगाम मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून राहुरी तालुक्यातील डाँ.तनपुरे साखर कारखान्याचा विषय चांगलाच गाजत चाललेला आहे. सुरुवातीला हा साखर कारखाना सहकारी तत्त्वावरचा चांगल्या प्रकारे चालवला गेला. डाँ.तनपुरे  कारखाना चालेल की नाही जर चालला तर कशा पद्धतीने चालेल. तसेच हा कारखाना उद्या इतर कोणाला भाडे तत्वावर द्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने देण्यात यावा, या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी तीन शासकीय व्हॅल्यूयरची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना दोन महिन्याची मुदत देऊन ते बँकेला त्यांचा अहवाल सादर करणार आहेत.                   

अमृत धुमाळ व माजी खा.प्रसाद तनपुरे यांना तुम्ही कोणतेही आंदोलन करू नका , बचाव कृती समिती स्थापन करू नका मी स्वतःहुन तुमच्या ताब्यात कारखाना देतो , तुमच्याच वडिलांनी उभा केलेला कारखाना तुम्ही चालवलाच पाहिजे.तुमच्या वडिलांचे – आजोबांचे वैभव तुम्हीच पुन्हा निर्माण केले पाहिजे.आम्ही आमच्या वडिलांचे- आजोबा-पंजोबांचे वैभव टिकून ठेवले असल्याचे विखे यांनी त्यावेळी  सांगितले होते. या संदर्भात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात आम्ही व्हॅल्यूयर नेमले असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात संचालक मंडळ यांच्यासमोर अहवाल ठेवला जाईल व त्यावर बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय होईल असे त्यांनी सांगितले.

COMMENTS